पुणे (ऑनलाइन हवेलीनामा) आयटी हब म्हणून भारतात ओळख असलेले पुणे शहरालगतचे हिंजवडी गाव असून या ठिकाणी आयटी क्षेत्रातील नामवंत कंपन्याचे जाळे येथे कार्यरत आहेत त्यामुळे लाखो उच्चशिक्षित तरुणांना रोजगार उपलब्ध होत असल्याने येथे महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपर्यातून उपजीवीकेसाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक येत आहेत त्यामुळे येथे या वाढत्या नागरिकीकरणामुळे अनेक गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या आहेत परिणामी परंपरागत शेती व्यवसायाचे सिमेंट जंगलात रूपांतर झाले असून व्यवसाय जवळपास नामशेष होत आहे असे असले तरी याभागात अजून काही लोक आपला हा पारंपरिक व्यवसाय जोमाने करताना दिसत आहेत.
हिंजवडी येथील प्रगतशील शेतकरी अरुण साखरे हे आपल्या शेतात भात लागवडी बरोबरच अन्य पीके घेत आहेत पावसाने थोडीफार उसंन्त घेतल्यामुळे ज्वारी पेरणी साठी त्यांनी आपले शेत बैलजोडीच्या साहाय्याने नांगरट करुन तयार केलं हे विशेष आहे बैलगाडी शौकिन असलेले व खिल्लर बैलांची कायम आवड जोपासणारे शेतकरी अशी त्यांची हिंजवडीसह पंचक्रोशीत ओळख आहे आज शेती तंत्रज्ञान खुप प्रगत झाले असून बैलांची जागा ट्रक्टरने घेतली आहे अनेक ठिकाणी शेतकरी अत्यधिनुक यंञाचा वापर करून शेती करत आहेत पंरतू वाढती महागाई डिजेलचे वाढलेले दर यामुळे शेती व्यवसाय परवडत नाही परंतु अरुण आण्णा साखरे हे आपल्या शेतातील सर्व कामे आजही बैलजोडीच्या साहाय्याने करत आहेत यामध्ये भात लागवडीचा चिखल असो अथवा ज्वारी बाजरी, सोयाबीन पिकासाठी शेत तयार करण्यासाठी ते बैलजोडीचाच वापर करतात हे विशेष. आयटी हब म्हणून ओळख असलेल्या हिंजवडीतील या शेतकऱ्यांची चर्चा माञ परिसरात खिल्लार प्रेमी म्हणून जोरात आहे लहानपणा पासून बैलांची आवड असून शेतातील सर्व कामे ते बैलजोडीच्याच साहाय्याने करतात.
