लोणी काळभोर (हवेलीनामा ऑनलाईन) मानवाच्या उत्क्रांतीचा इतिहास तपासला तर शेतीची सुरुवात ही महिलेनेच केलेली असून कुटूंब व्यवस्थेतही स्त्रियांचाच अग्र सहभाग असल्याचे दिसून येते.त्यामुळेच स्री ही मानव जातीमध्ये महत्वाची भूमिका बजावत आलेली आहे असे गौरवोद्गार लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी काढले ते पै.दत्तात्रय उर्फ आबा काळे सामाजिक प्रतिष्ठाण अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या स्वयंसिध्दा फाऊंडेशन आयोजित फुड फेस्टीवलच्या उद्धाटन प्रसंगी बोलत होते.यावेळी प्रमुख उपस्थितीत लोणी काळभोरच्या प्रथम नागरिक सरपंच माधुरी काळभोर, उपसरपंच संगीता काळभोर, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे,ग्रामपंचायत सदस्या सविता लांडगे,ग्राहक कल्याण फाऊंडेशनचे संस्थापक सूर्यकांत गवळी,अॅड.अनिता गवळी, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला तालुकाध्यक्ष सुरेखा भोरडे, महिला बचत गटाच्या समन्वयक संगीता काळभोर,राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद वैराट,दत्तात्रय तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.



