देशातील मुलभूत सुविधा देण्यावर कायम भर दिला जातो तसा यावर भरपूर बोललेही जाते यात रस्ते पाणी व उर्जा स्रोत यांचा प्रामुख्याने उल्लेख होतो परंतु देशाला बळकट बनविण्यात महत्वाची भूमिका बजावणारा घटक म्हणजे तरुण आहे याच्या सर्वांगीण विकासासाठी सुरुवाती पासून प्रयत्न होणे गरजेचे आहे मुलांचा सर्वांगीण विकास साधण्यात मोलाची भूमिका त्याला मिळणारे शिक्षण बजावत असत आणि सध्या याकडेच प्रकर्षाणे बघण्याची आवशकता निर्माण झाली आहे.
          आपला देश वैविध्यपूर्ण असून विविध धर्म जाती प्रांत याने बनलेला आहे त्यामुळेच भाषावार प्रांत रचना तयार झाली असून यामध्ये हिंदी भाषिक प्रांत मोठा आहे.मुलांना जर त्यांच्या मातृभाषेत उत्कृष्ट शिक्षण उपलब्ध करुन दिले तर यात मोठी क्रांती होईल.सध्या सगळीकडे इंग्रजी माध्यमाचे फॅड दिसून येत आहे यासाठी मोठी फिस देण्यासाठी चढाओढ लागलेली असते सगळ्यात महत्वाचे म्हणजे इतरांना हिणकस वागणूक दिली जाते.
       जगात असे अनेक देश आहेत जिथे केवळ आपल्याच मातृभाषेत शिक्षण दिले जाते आणि ते देश जगात पुढारलेले आहेत.फ्रान्स रशिया इटली यासारख्या देशात हे शक्य होत त्यांच काहीच अडत नाही मग आपल्यालाच ही अडचण का ? यामागे मोठ षडयंत्र तर नाही ना अशी शंका येत आहे आपल्या राज्यातील मराठी शाळेत जाणाऱ्या मुलांची संख्या हळूहळू रोडावते आहे आणि शासन कोट्यावधी रुपये यावर खर्च करते आहे मग मुल याकडे का वळताना दिसत नाहीत याचे कारण शोधावे लागेल.
     साधारणपणे तीस ते पस्तीस वर्षापूर्वी याच मराठी शाळेतून शिक्षण घेणारे विद्यार्थीच सर्व क्षेत्रात चमकलेले आहेत अगदी पहिल्या इयत्तेत शिकवलेली एखादी कविता आजही तशीच डोळ्यासमोर उभी राहते.याच श्रेय त्यावेळच्या शिक्षकांना जात तशा रसाळ, मधूर व रममाण होऊन शिक्षणाचे धडे मिळाले तर आजही तशीच परिस्थिती तयार होऊ शकेल.
        निसर्ग नियमानुसार कोणत्याही मुलास त्याच्या मातृभाषेत शिक्षण दिले तर तो अधिक जास्त त्याकडे लक्ष देतो परंतु इतर भाषेचा त्याच्या मानसिकतेवर परिणाम करतो.यासाठीच शासन कर्त्यांनी शाळेचा शैक्षणिक स्तर विकसित करुण मुलांना त्यांच्या उपजत गुणांना वाव देणारे सर्वसमावेशक शिक्षण द्यावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *