थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) आपल्या समाजात नागरिकांना जीवन जगताना अनेकविध अडचणींना सामोरे जावे लागते यात सर्वांनाच सगळ्या सुविधा मिळतील असे नाही अशावेळी समाजातील अशा नागरिकांना आपण आधार द्यावा याच उद्देशाने समाजाभिमुख काही उपक्रम हाती घेण्याचे ठरवले असून जागतिक माहिलादिनाचे औचित्य साधून थेऊर येथील दत्ताञय ऊर्फ आबा काळे सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने मोफत नेञ तपासणी व चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, पवार चारिटेबल ट्रस्ट याच्या संयुक्त विधमाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे उदघाटन यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक पाडुंरंग काळे यांनी केले.यावेळी माजी उपसरपंच नितिन कुंजीर, मुंबई महापौर केसरी आबा काळे, ग्रा.पं.सदस्य राहूल कांबळे, आंनद वैराट उपस्थित होते.
या शिबिराला थेऊर येथील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला कारण या शिबिरात केवळ तपासणी न करता नागरिकांना नंबरचे चष्मे वाटप करण्यात आले.यात तब्बल 670 नागरिकांची तपासणी करण्यात आली तर यातील 374 लाभार्थ्यांना मोफत चष्मे वाटण्यात आले व 20 जणांच्या डोळ्यातील मोतीबिंदू शस्त्रक्रिया प्रतिष्ठाणच्या वतीने मोफत केली जाणार आहे.डोळे तपासणी करिता पवार चारिटेबल ट्रस्ट चे डॉ तमन्ना शेख व डाॅ.रणदिवे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मदत केली.
या वेळी प्रतिष्ठाणच्या अंतर्गत महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण उत्पादन व बाजारपेठ यासाठी स्वयंसिध्दा फाऊंडेशन चे औपचारिक उद्घाटन करण्यात आले
