थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) पुणे सोलापूर महामार्गावरील मोठ्या लोकवस्तीचे गाव असलेल्या  लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी माधुरी राजेंद्र काळभोर यांची बिनविरोध निवड झाली ही निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडलाधिकारी गौरी तेलंग यांनी काम पाहिले.

         लोणी काळभोरचे सरपंच राजाराम काळभोर यांनी पॅनेल प्रमुखांनी ठरवलेल्या कार्यकाळात आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी लोणी काळभोर ग्रामपंचायत सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडली सरपंच पदासाठी माधुरी काळभोर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सरपंच म्हणून बिनविरोध निवड झाली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य माधव काळभोर,विलास काळभोर,सुभाष काळभोर,शिवदास काळभोर,महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर,माजी उपसभापती सनी काळभोर,जिल्हा परिषद सदस्या सुनंदा शेलार, आण्णासाहेब काळभोर,योगेश काळभोर, नागेश काळभोर आदी उपस्थित होते.
          गावच्या सर्वांगीण विकासाच्या कामाची जी गती चालू आहे त्याच गतीने नागरिकांना सुविधा पुरविण्यासाठी सातत्य ठेवण्यास कटीबध्द असुन पुढील पंचवीस वर्षेचे नियोजन करुन पिण्याच्या पाण्याचे नियोजन, आरोग्य सुविधा, रस्ते, विज याचा चांगला आराखडा बनवुन योग्य नियोजन करणार असल्याचे सरपंच माधुरी काळभोर यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *