किरण खुडे
राजगुरुनगर : (हवेलीनामा आॕनलाईन) : नवाब मलिक कोठडीतून लवकर बाहेर येतील असे वाटत नाही. त्यांच्या चौकशीची व्याप्ती दुबई, कराची इथपर्यंतही असू शकते. ते मुस्लिम आहेत म्हणून त्यांचा संबंध दाऊदशी जोडला जात असल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे म्हणणे चुकीचे आहे. ते राजगुरूनगर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
सोमय्या पुढे म्हणाले, मी कधीही पुराव्याशिवाय बोलत नाही. संजय राऊतांकडे मात्र एकही पुराव्याचा कागद नाही. असेल तर गेले अनेक महिने ते गप्प का बसले आहेत? त्यांचा भागीदार सुजित पाटकर याला पात्रता नसताना कोविड सेंटरचे काम दिले गेले. कोविड घोटाळा बाहेर काढला, म्हणून राऊत काहीही बोलत आहेत. माझ्याविरुद्ध व माझ्या कुटुंबियांविरुद्ध केलेले आरोप खोटे असून त्यासंदर्भात मुंबई पोलिसांनी न्यायालयात दिलेल्या अहवालात माझ्याविरुद्ध कोणतीही तक्रार दाखल नसल्याचे म्हटले आहे. राकेश वाधवान व माझा काडीचाही संबंध नाही. जितेंद्र नवलानींना ओळखत असल्याचे मला आठवत नाही, असा खुलासा सोमय्या यांनी केला.
यशवंत जाधव हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ‘फंड कलेक्टर’ आहे, तर बजरंग खरमाटे हा परिवहन मंत्री अनिल परब यांचा ‘सचिन वाझे’ आहे, असा आरोप भाजपचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी येथे केला आहे. एजंटकडे एवढे घबाड मिळाले, तर मुख्य कलेक्टरकडे किती पैसे असतील, असाही सवाल त्यांनी केला. राकेश वाधवान व माझा काडीचाही संबंध नाही. संजय राऊतांच्या आरोपांना काडीचीही किंमत नाही, कारण पुराव्याचा एकही कागद ते देऊ शकले नाहीत.असेही त्यांनी स्पष्ट केले.
पवारांचे आणि दाऊदचे संबंध आहेत, असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. तुम्ही मुस्लिम आहात का? तुमचा आदर आहे, पण देशद्रोह्याला पाठिशी घालू लागले तर चालणार नाही, असे ते मलीक यांच्याबाबत म्हणाले.
महाराष्ट्राला भ्रष्टाचारमुक्त आणि माफियामुक्त करण्यासाठी मी अनेक प्रकरणे घेऊन ईडी, सीबीआय, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय इत्यादी ठिकाणी जात असतो. महाराष्ट्रातील जनतेच्या भल्यासाठी हे सर्व करतो. त्यामुळे मला ईडीचा एजंट म्हटल्याने मला काही वाटत नाही. मी खरेतर महाराष्ट्राच्या जनतेचा एजंट आहे, असे सोमय्या यांनी स्पष्ट केले.
किशोरी पेडणेकरांनी एसआरए योजनेत गाळे ढापले, याची खात्री झाली आहे. त्यासाठी उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर लवकर सुनावणीसाठी प्रयत्न सुरू आहेत. यशवंत जाधवांनी बेनामी कंपन्या काढून फसवणूक केली. त्याच्या चौकशीच्या मागे लागणार आहे, असेही ते म्हणाले
