थेऊर(हवेलीनामा आॕनलाईन) पुर्व हवेलीतील थेऊर,कुंजीरवाडी आंळदी म्हातोबा,कोलवडी साष्टे येथे जागतिक माहिलादिन विविध उपक्रमांची साजरा करण्यात आला.थेऊर ग्रामपंचायत सभागृहात महिलासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले यावेळी सरस्वतीचे पुजन सरपंच शितल काकडे यांनी केले यावेळी महिला सदस्या शशिकला कुंजीर,चंद्रभागा शिर्के, गौतमी कांबळे,रुपाली रसाळ,पोलिस पाटील रेश्मा कांबळे,ग्रामसेवक तुकाराम पाटील तसेच गावातील महिला बचत गट, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.सभेची सुरुवात वसुंधरा रक्षणाच्या शपथेनी झाली.
पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभाग, शारदा ग्राम आरोग्य संजीवनी कार्यक्रमा अंतर्गत मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने थेऊर येथील चिंतामणी विद्यामंदीर येथे केले होते, यात प्रामुख्याने हदयविकार तपासणी,मधुमेह,उच्चरक्तदाब,स्ञीरोग तपासणी,गरोदर माता तपासणी,नेञरोग तपासणी इत्यादी तपासण्या करण्यात आल्या महिलादिन निमित्ताने उपस्थित महिला डाॕक्टर महिला पदाधिकारी यांच्या हस्ते केक कापण्यात आला. यावेळी पंचायत समितीच्या सदस्या कावेरी कुंजीर,थेऊरच्या सरपंच शितल काकडे,पं.स.माजी सदस्य हिरामण काकडे,विठ्ठल काळे,प्राचार्य बाळासाहेब नेवाळे,माजी सदस्य मारुती कांबळे,मधुकर खरात, उपस्थित होते या शिबिराला गावातील जेष्ठ नागरिकांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला तब्बल दोनशे पन्नास लोकांनी विविध प्रकारच्या शारीरिक तपासण्या करुन औषधे घेतली यावेळी कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ महेबूब लुकडे,विश्वराज हाॕस्पिटलचे डाॕ मेहा डोबरिया,डाॕ शिल्पा दलाल,आरोग्य सेवक प्रशांत बिराजदार,संजय औंधकर,विजयमाला शेलार,सुरेश दिवार,सुनिल वाघमारे,सारिका भिसे यांनी तपासणी केली तसेच आशा सेविका यांनी शिबिरात मोलाची साथ दिली.
हे सर्वरोग अरोग्य शिबीर जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून व परिसरातील खाजगी रुग्णालयाच्या सहकार्यातून घेतले जाते यासाठी त्या रुग्णालयास याची आगाऊ कल्पना देऊन हे शिबीर आयोजित करण्यात येते आपणही समाजाचे देणे लागतो याच भावनेतून सहभाग नोंदवला जातो.शिबीरात प्रत्येक विषयातील निष्णात वैद्य असणे अपेक्षित असते.