थेऊर (हवेलीनामा ऑनलाईन) थेऊर – नायगाव शिव रस्त्यावर मोठा शासकीय निधी पडल्यानंतर त्या रस्त्याची रुंदी तीस फुट होणार आहे यासाठी यामार्गावरील अतिक्रमणे काढून तो रस्ता मोकळा केला यात तेथील स्थानिकांनी दाखवलेला मोठेपणा कारणीभूत ठरला परंतु काहींची हरकत असल्यास ती समजूत काढून पुर्ण करण्यात आली.परंतु थेऊरकरांना होणारी खरी अडचण थेऊर तारमळा काकडे मळा या रस्त्याची असून या रस्त्यावरून 80% वाहतुक होत आहे.हा वाहतूकीचा ताण झेलणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण याच पद्धतीने निघणार की लोकांची अशीच कुचंबणा होणार असा प्रश्न स्थानिक करत आहेत कारण मुख्य रस्त्यात अनेक अडथळे निर्माण होत असल्याने तो रस्ता होण्याची शक्यता धुसर झाल्याने आता पूर्वीचा तारमळा काकडेमळा रस्ता अतिक्रमणमुक्त करुन त्यावर निधी वर्ग करावा अशी मागणी होत आहे.

         या मार्गावरील अतिक्रमण काढण्याचे धाडस महसूल विभाग दाखवणार का असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे रस्ता मोकळा करून यावर निधी पडल्यास अडचणी निश्चित दूर होतील अशी आशा आहे म्हणून महसूल विभागाने पुढाकार घेऊन यावर असलेली अतिक्रमणे दूर करावीत कारण आज हा रस्ता इतका अकुंचण पावला असून केवळ दहा फुटाचा रस्ता शिल्लक आहे त्यामुळेच दोन मोठी वाहने समोरासमोर आली तर मोठी अडचण निर्माण होते.
       थेऊरच्या मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने स्थानिकांचे मोठे अर्थिक नुकसान होत आहे अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असल्याने सार्वजनिक वाहतूकीचा बट्ट्याबोळ उडाला आहे पी एम पी एम एल कडून पूर्वी धावत असलेल्या चार बसेस ऐवजी केवळ एकच बस उपलब्ध आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना व कामगारांना खुप त्रास सहन करावा लागतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *