जगदीश का. काशिकर,
चन्द्रपुर (हवेलीनामा ऑनलाईन) जगातील प्रत्येक व्यक्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे.मनुष्य ही ईश्वराने तयार केलेली निसर्गातील रहस्यमय अद्भुत कलाकृती आहे.आपल्यातील कलागुण ओळखून आत्मविश्वासाने विकसित ते केले तर चमत्कार घडतो.या साठी जिद्द व चिकाटी पाहिजे, जिद्द,चिकाटी व आत्मविश्वास शिल्पा आडम (शिल्पा चिंतावार) यांच्यात होती म्हणून त्यांनी एक वर्षाच्या परिश्रमानंतर मिसेस इंडिया 2021 या पुरस्कार पटकावला.शिल्पा आपल्या भाग्याची शिल्पकार बनली,तुम्ही पण  शिल्पा सारखेच भाग्याचे शिल्पकार बना,असे प्रतिपादन विधिमंडळ लोकलेखा समिती अध्यक्ष,माजी वित्तमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ते भाजपा जनसम्पर्क कार्यालय येथे महानगर भाजपा तर्फे जागतिक महिलादिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित मिसेस इंडिया 2021पुरस्कार विजेत्या सौ शिल्पा आडम यांचा सत्कार कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना बोलत होते.
        यावेळी भाजपा महानगर जिल्हाअध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे,संघटन महामंत्री राजेंद्र गांधी,महापौर राखी कंचर्लावार,उपमहापौर राहुल पावडे,महामंत्री सुभाष कासनगोट्टूवार,रवींद्र गुणिले,कोषाध्यक्ष प्रकाश धारणे,महिला मोर्चा अध्यक्ष अंजली घोटेकर,आत्मनिर्भर भारत जिल्हाध्यक्ष किरण बुटले,रवी लोणकर,अरुण तिखे,रितेश वर्मा,रामकुमार अकापेलीवार आदी उपस्थित होते.
यावेळी शिल्पा आडम यांचा बांबू पासून निर्मित तिरंगा ध्वज आ.मुनगंटीवार यांचे हस्ते प्रदान करून सत्कार करण्यात आला.तर प्रकाश धारणे यांनी सिंहावलोकन पुस्तिका देऊन, शिल्पा आडम यांना आ.मुनगंटीवार यांच्या विकासकार्याचा परिचय करून दिला.
       अमेरिकेतील मायामी येथे होणाऱ्या मिसेस वर्ल्ड 2022 या स्पर्धेसाठी शिल्पा भारताचे नेतृत्व करणार आहे.आपल्या आत्मविश्वासाच्या बळावर ती विजयी होईल, असा विश्वास आ.मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
     आत्मविश्वास,इच्छाशक्ती व जिद्द हे यशाचे सूत्र आहे.स्वबळावर कोणतीही मातृशक्ती हिमालयाची उंची गाठू शकते.आपले स्वप्न सजीव असावे. फक्त पंख राहून चालणार नाही,तर प्रबळ इच्छाशक्तीनेच उंच भरारी घेता येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *