पुणे (हवेलीनामा ऑनलाईन) अकोला येथे नुकत्याच पार पडलेल्या सब ज्युनियर बॉक्सिंग स्पर्धेत पुणे येथील क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे बॉक्सिंग क्लब च्या तीन विद्यार्थिनींनी सुवर्णपदकाची कमाई केली असून गुजरात मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अकोला येथे सब जूनियर राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा पार पडल्या यात 34 ते 36 किलोग्रॅम वजन गटात सोनिया अभिमन्यू सूर्यवंशी 48 ते 50 किलोग्रॅम वजन गटात सृष्टी विजय जाधव तर 50 ते 52 किलो वजन गटात सायली अशोक जाधव या विद्यार्थिनींनी सुवर्ण पदक पटकावले.
याना बॉक्सिंगसाठी क्रांतिवीर लहूजी वस्ताद साळवे बॉक्सिंग क्लबजे सचिव मदन वाणी,आंतरराष्ट्रीय आईबा प्रशिक्षक विजय गुजर,अभिमन्यू सूर्यवंशी,राम जगताप, अमोल सोनवणे,विशाल गव्हाणे यांनी मार्गदर्शन केले आहे.या विद्यार्थीनी गुजरात येथे होणाऱ्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत राज्याचे नेतृत्व करणार आहेत.
सृष्टी विजय जाधव ही पुणे शहर पोलीसात लोणी काळभोर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या थेऊर पोलीस चौकीत पोलीस हवालदार या पदावर कर्तव्यावर असलेल्या विजय नथू जाधव यांची कन्या आहे.तिच्यावर पोलीस स्टेशनसह परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे
