पुणे (ऑनलाइन हवेलीनामा)  कोरोनापासून बचावासाठी लसीकरण करून घेणे आवश्यक आहे यासाठी शासन मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करीत आहे आजपर्यंत बऱ्याच नागरिकांनी लस घेतली आहे परंतु अनेकजण यापासून वंचित आहेत आज प्राथमिक आरोग्य केंद्र कुंजीरवाडी अंतर्गत थेऊर येथे महा कोविड १९ लसीकरण मोहीम घेण्यात आली यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने १००० डोस उपलब्ध करुन देण्यात आले.यातून गावचा लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे

    ­       कोरोनाचे तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने लसीकरणावर भर दिला जात आहे वेगवेगळ्या ठिकाणी लसीकरण महिमेचे आयोजन करण्यात येत आहे. थेऊर ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र कुंजीरवाडी व आरोग्यवर्धिनी थेऊर यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबविण्यात आली यासाठी यशवंतराव चव्हाण मेमोरियल इंग्लिश स्कुल येथे प्रशस्त व्यवस्था करण्यात आली. यासाठी चार कक्ष तयार केले होते यामध्ये वय १८ ते  ४४ पुरुष, १८ ते ४४ स्त्री,४५ ते ५९ पुरुष व महिला, ६० वर्षे वरील वयोवृद्ध व गरोदर महिला आणि स्तनदा माता यांच्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती.आजच्या मोहिमेनंतर गावची टक्केवारी ही ७० ७५ टक्क्यांपर्यंत पोहोचेल.
         या मोहिमेत प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉ माहेबूब लुकडे, सामाजिक आरोग्य अधिकारी शिल्पा दलाल, सुखदा कदम, प्रेरणा वाघमारे,आरोग्य कर्मचारी राजश्री निकम,संतोष वाघमारे, भरती सोनवणे, माया शिंदे,बागवान,नंदा शिंदे, रुपाली,शेलार, वर्षा कामठे,रेखा कुंजीर, आश्विन,प्रशांत बिराजदार, तसेच प्राथमिक शाळा तारमळाच्या शिक्षिका सरिता परदेशी आशा सेविका ज्योती टोम्पे,दिपाली सावंत, मंगल जवळकर, कोमल वाल्हेकर,प्रियांका निगडे,हेमलता नेमाडे,सुरेखा फडतरे,राधिका चोरमाळे यांनी सहभाग घेतला.
          थेऊर ग्रामपंचायतीच्या वतीने सुयोग्य नियोजन करून कर्मचाऱ्यांसाठी चोख व्यवस्था करण्यात आली होती तर ग्रामपंचायतचे सर कर्मचारी दिवसभर व्यवस्था पुरविण्यासाठी लक्ष ठेवून होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *