पुणे (हवेलीनामा ऑनलाईन) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील गुंठेवारी बांधकामे नियमित करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून संबंधित बांधकाम धारकांनी 31 मे पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन पीएमआरडीए कडून करण्यात आलेले आहे.
राज्य शासनाच्या आदेशानुसार महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम 2001 मध्ये सुधारणा केली असून 31 डिसेंबर 2020 पूर्वी गुंठेवारी पद्धतीने झालेली अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची संधी दिली गेली असून ज्या नागरिकांनी खाजगी जमिनीवर अनधिकृत रेखांकनात 31 डिसेंबर 2020 पूर्वी बांधकामे केली आहेत त्यांनी इकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे तसेच अनधिकृत विभागणी केलेल्या भूखंडा मध्ये केलेल्या अनधिकृत बांधकामांसाठी परवानाधारक अभियंत्याकडून 31 मे पर्यंत पी एम आर डी एच्या कार्यालयात प्रस्ताव दाखल करण्याचे बंधनकारक केले आहे
पीएमआरडीए ने 2 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप विकास आराखड्यात दाटीवाटी क्षेत्रामधील रेखांकने मोकळा भूखंड वगळता केवळ अनधिकृत रहिवासी बांधकामे पुणे प्रादेशिक योजनेतील रहिवास विभाग क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे पुणे महानगरपालिका क्षेत्रात नव्याने समाविष्ट झालेल्या व पीएमआरडीए नियोजन प्राधिकरण असलेल्या 23 गावठाण हद्दीमधील रेखांकन मोकळा भूखंड उधळता केवळ अनधिकृत बांधकामे नियमित होऊ शकणार आहेत. रेड झोन, बफर झोन, हिल स्लोप, शेती किंवा ना विकास झोन, वनीकरण झोन शासकीय व खासगी वने, प्रादेशिक योजनेतील आणि प्रारूप विकास आराखड्यातील रस्ते, आरक्षण नदीपात्र, शासकीय जागा या ठिकाणची अनधिकृत बांधकामे मोकळे भूखंड अंशतः बांधकामे नियमित केली जाणार नसल्याचे आयुक्त सुहास दिवसे यांनी स्पष्ट केले.
