पुणे (हवेलीनामा ऑनलाईन) उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस आज पासून सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे दिसून आले आहे.कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी दहावी व बारावीच्या परिक्षा घेता आल्या नव्हत्या.

      कोरोना महामारी मारी मुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासावर मोठा परिणाम झाला तब्बल दोन वर्ष विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले एकामागून एक तीन लाख संपूर्ण जगात पसरल्या त्यामुळे अनेक खडक निर्बंध लावण्यात आली शाळा महाविद्यालय बंद करण्यात आली त्यामुळे प्रत्यक्ष शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहिले सन 2020 मध्ये इयत्ता बारावी दहावी परीक्षा पार पडल्या केवळ इयत्ता दहावीचा भूगोल पेपर शिल्लक राहिला त्यावेळी लॉकडाउन कोश करण्यात आले इतर इतर वर्गांच्या परीक्षा घेता आल्या नाहीत त्यांना सरसकट पुढील वर्गात प्रवेश देण्यात आला परंतु त्यानंतर शाळा उघडण्यात आल्या नाही त्यामुळे मार्च 22 मध्ये होणाऱ्या परीक्षा घेता आल्या नसल्याने केवळ वार्षिक मूल्यांकनावर विद्यार्थ्यांना गुण देण्यात आले.
        यावर्षी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षणाचा खूपच थोडा कालावधी मिळाला त्यामुळे याहीवर्षी ऑनलाईन परीक्षेची मागणी होत होती परंतु शिक्षण विभागाने इयत्ता दहावी व बारावी यांच्या ऑफलाइन परीक्षा घेण्याचे ठरविल त्यानुसार आजपासून इयत्ता बारावीच्या परीक्षेस सुरुवात झाली यावेळी विद्यार्थ्यांना विशिष्ट केंद्रावर परीक्षेत जाण्याची गरज पडली नाही कारण वेगवेगळ्या ठिकाणचे विद्यार्थी एकत्र येण्यामुळे कोरोना संसर्गाच्या शक्यता लक्षात घेऊन आपल्याच विद्यालयात परीक्षा देण्याची व्यवस्था करण्यात आली होती थेऊर येथील चिंतामणी विद्या मंदिर येथे केंद्र संचालक बाळासाहेब नेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा सुरुवात झाली एकूण 31 परीक्षार्थी विद्यार्थी असल्याचे त्यांनी सांगितले त्यापैकी एक जण गैरहजर होता बाकी सर्व विद्यार्थी परीक्षा केंद्रात शांततेत प्रश्न पत्रिका सोडवत असल्याचे चित्र दिसून आले यावेळी थेऊर पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, पोलीस नाईक बनकर तसेच केंद्र उपसंचालक मधुकर खरात, परीक्षा विभागातील सहकारी राजाराम काकडे, महादू जढर, शांताराम काटकर, जीवन शिंदे व करुणा कंद यांनी सहकार्य केले तर सहाय्यक परिरक्षक म्हणून चंद्रकांत कोकणे केंद्रावर उपस्थित होते.
          तसेच लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल विद्यालयात एकूण 475 परीक्षार्थी विद्यार्थी असल्याचे प्राचार्य गवळी यांनी सांगितले यामध्ये कला वाणिज्य व विज्ञान शाखेचे एकूण चारशे दहा विद्यार्थी तर किमान कौशल्य विभागाचे 65 विद्यार्थी परीक्षेसाठी असल्याचे माहिती त्यांनी सांगितले. लोणी काळभोर हे या विभागातील इयत्ता बारावीचे परीक्षा केंद्र म्हणून ओळखले जाते.या वर्षी केंद्र संचालक म्हणून ए बी कचरे हे काम पाहत आहेत.
       विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षण कमी मिळाल्यामुळे त्यांना परीक्षेत अडचणी येऊ नयेत यासाठी परीक्षा मंडळाने विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका संच दिल्या होत्या त्याच्या सरावातून विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी करावयाची होती याचा फायदा विद्यार्थ्यांना निश्चित होईल अशी अपेक्षा आहे यावेळी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी अर्धा तास आगाऊ वेळ देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *