पुणे (हवेलीनामा ऑनलाईन) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संभाव्य पुणे दौरा च्या अनुषंगाने स्थायी समितीने अडीच हजार कोटींच्या विकास कामांना मान्यता दिली असून यामध्ये नदीकाठ सुधारणा प्रकल्प व नदी मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प यांचा समावेश आहे स्थायी समितीच्या बैठकीमध्ये ऐंशी विषयांना मान्यता देण्यात आली असून सुमारे अडीच हजारांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे

        मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प अंतर्गत शहरात निर्माण होणाऱ्या शंभर टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार असून या प्रकल्पाच्या निवेदने साठी केंद्र सरकार व अर्थसहाय्य करणारी जपानची जायका या कंपनीने निविदा प्रक्रियेला मान्यता दिली होती या प्रकल्पात अकरा ठिकाणी मैलापाणी शुद्धीकरण केंद्र उभारणे सुमारे 113 किलोमीटर लांबीचा मैलावाहिन्या विकसित करणे अशा अनेक उपाय योजना केल्या जाणार आहे
      नदी सुधार प्रकल्पात दोन टप्प्यात नियोजन असून पहिला टप्पा संगमवाडी ते बंडगार्डन एकूण 3.7 किलोमीटर्स आंतर यासाठी एकूण खर्च 264 कोटी रुपये तर दुसरा बंडगार्डन ते मुंडवा एकूण खर्च 604 कोटी रुपये आणि रुंदी 5.3 किलोमीटर इतकी आहे या प्रकल्पांतर्गत माती खोदाई, मुरूम खोदाई, कठीण दगडांमधील खोदाई, वाहतूक करणे, पदपथ निर्मिती करणे, सायकल ट्रॅक तयार करणे, झाडे लावणे, विद्युत रोशनाई करणे अशा विविध उपक्रमांचा यात समावेश असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *