थेऊर (शरद पुजारी) सनातन भक्तीमध्ये देवाच्या सगुण साकार भक्तीला अनन्यसाधारण महत्त्व असून त्या देवाची अनेकविध रुपे हिंदू धर्मात प्रचलित आहेत यात सर्वांना आपलस वाटणारे रुप म्हणजे भगवान गणेशाचे रुप होय.हिंदू धर्मात उपासनेलाही तेवढच महत्त्व आहे त्यामुळेच अनेक देवदेवतांच्या उपासनेनुसार पंथ प्रचलित पडले यात शैव व वैष्णव हे त्यातील प्रमुख पंथ, परंतु गणपतीची उपासना करणारा आणखी एक पंथ म्हणजे गाणपत्य होय,यातील उपासक भगवान गणेशाची आराधना करतात.

         थेऊर  हे गणपतींसाठी प्रसिद्ध अष्टविनायकांपैकी एक तीर्थक्षेत्र होय येथे भगवान गणेशाने श्री चिंतामणीच्या रुपाने अवतार धारण केला अशा पवित्र स्थळी या चिंतामणी गणपतीच्या जयंती उत्सवाचे आयोजन दरवर्षी येथील देऊळवाड्यात केले जाते या निमित्ताने गणेशकथाकार ह भ प रुख्मिणी तारु महाराज गेली अठरा वर्षे याचे आयोजन करतात.हा उत्सव सात दिवस चालतो.
      गेल्या काही वर्षापासून त्यांचा मुलगा ह भ प चिंतामणी तारु महाराज आपल्या मधूर व रसाळ वाणीतून श्री चिंतामणी विजय ग्रंथाचे निरुपण करत असून यासाठी त्यांना गायक व वादक यासह साथसंगत मिळत आहे.
       गणेशभक्तीस संतांच्या वैष्णव संप्रदायाची जोड देऊन ती श्रवणीय भाषेत मांडत असल्याने ती सोपी व उत्सुकतावर्धक, रंजक वाटत आहे.भगवान गणेशाबद्दल प्रचलित धर्मग्रंथातील कथा निरुपण ऐकण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने जमत आहेत. गणेशा विषयी प्रचलित काही गोष्टींबद्दल यातून माहिती मिळत आहे आज अशाच गणेशास प्रिय असलेल्या दुर्वा आख्यानाची माहिती वेगवेगळ्या कथाच्या रुपाने मांडली तसेच या पंथातील चतुर्थीचे नक्की महत्त्व काय हा उपवास का करावा याबाबत सविस्तर विश्लेषण केले.आजचा कथेचा पाचवा दिवस होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *