पुणे (हवेलीनामा ऑनलाईन) लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीत दहशत पसरवून नागरिकांना दमदाटी करणाऱ्या गुन्हेगारांना शोधून त्याची खातरजमा करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांना वरिष्ठ कार्यालयाकडून मिळाले त्यानुसार त्यांनी पोलीस स्टेशनचे अधिकारी व आमदार यांना अशा गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आदेश दिले त्यानुसार सराईत गुन्हेगार संकेत सुनील गायकवाड (वय 25 वर्ष) राहणार कवडीपाट टोल नाका कदमवाकवस्ती, लोणी काळभोर हा हडपसर पोलीस स्टेशन, लोणी काळभोर परिसरात वारंवार गुन्हे करीत असल्या बाबतच्या तक्रारी असून तो नेहमी गुंड साथीदाराबरोबर कदमवाकवस्ती, लोणी काळभोर,  लोणी स्टेशन अशा लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे कार्यक्षेत्रात गुन्हेगारी कृती करीत असतो त्याची लोणी काळभोर व कदमवाकवस्ती परिसर, लोणी स्टेशन या भागात जबरदस्त दहशत निर्माण झाली आहे तो सतत आपल्या साथीदारांना बरोबर धुमाकूळ घालत असतो त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये घबराहट, भीती, असुरक्षितता निर्माण झाली आहे अशा प्रकारच्या नागरिकांकडून तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत

         पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी संकेत सुनील गायकवाड याच्यावर तडीपारीचा प्रस्ताव तयार करून पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 पुणे शहर नम्रता पाटील यांच्याकडे पाठवला होता त्यावर या प्रस्तावाची पडताळणी करून त्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 56 अन्वय पुणे शहर, पिंपरी चिंचवड आयुक्तालय, पुणे जिल्ह्यातून दोन वर्षे करिता तडीपार करण्याचा आदेश पारित केला आहे.
       ही कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 पुणे शहर नम्रता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी पोलीस निरीक्षक सुभाष काळे पोलीस उपनिरीक्षक भागवत शेंडगे, पोलीस हवालदार गणेश सातपुते, पोलीस नाईक संदीप धनवटे, पोलीस शिपाई मल्हार ढमढेरे यांनी केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *