पुणे ( हवेलीनामा ऑनलाईन) लोणी काळभोर येथील ग्रामपंचायत  पदाधिकाऱ्यांकडून गावच्या विकास कामासाठी सातत्याने पाठपुरावा करुन वेगवेगळ्या विकास कामे मंजूर करून आणली त्यामुळेच मतदार संघात सर्वात जास्त निधी लोणी काळभोर गावाला मिळाला यापुढे सुध्दा यात सातत्यता राखली जाईल एक उपनगर म्हणून नागरिकांना सर्वतो मुलभूत सुविधा पुरविण्यात येतील असे आमदार अशोक पवार यांनी प्रतिपादन केले.

         लोणी काळभोर येथील पुणे सोलापूर महामार्ग ते दत्त मंदिर चौक या १ कोटी ३५ लक्ष रु. कामाच्या रस्त्याचे भूमिपूजन आमदार अशोक पवार याच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते यावेळी माजी जिल्हा परिषद  सदस्य माधव काळभोर, विलास काळभोर, महाराष्ट्रकेसरी.राहुल काळभोर, शिवदास काळभोर, सुभाष काळभोर, जिल्हा परिषद सदस्य.सुनंदा रघुनाथ शेलार,अनिल टिकेकर सभापती पंचायत समिती हवेली, पंचायत समिती सदस्य सनी काळभोर, राष्ट्रवादी कॉग्रेस हवेली तालुकाध्‍यक्ष दिलीप वाल्हेकर, .किरण शिवदास काळभोर,सीताराम लांडगे (अध्यक्ष-मराठी पत्रकार संघ जिल्हा पुणे), गावचे सरपंच राजाराम विठ्ठल काळभोर, उपसरपंच संगीता सखाराम काळभोर, ग्रा.पं. सदस्य  योगेश काळभोर, नागेश काळभोर, भरत काळभोर, तसेच  सदस्या ज्योती अमित काळभोर, साविता गीताराम लांडगे, प्रियांका सचिन काळभोर, माधुरी राजेंद्र काळभोर, भारती राजाराम काळभोर,  , ग्रामविकास अधिकारी जे.एच.बोरावणे, तसेच सोनाली शिवरकर (सरपंच आळंदी म्हातोबा) भोलेनाथ शेलार (मा.सरपंच), आण्णासाहेब काळभोर (मा.उपसरपंच), राजेंद्र काळभोर (मा.उपसरपंच), युवराज काळभोर, श्रीरंग काळभोर, सूर्यकांत काळभोर, आनंद काळभोर, मोहन लक्ष्मण काळभोर, भुजंग काळभोर, अर्जुन काळभोर, सागर काळभोर, सचिन काळभोर,किरण वाळके,. आणि सर्व ग्रामपंचायत कर्मचारी वृंद आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *