पुणे (हवेलीनामा ऑनलाईन) कोणताही कलाकार हा वारसा घेऊनच जन्माला येतो पण सगळ्यांनाच संधी मिळते असे नाही परंतु आपल्यातील उपजत कला तो पाजळत ठेवत असतो असा एक अवलिया पोलीस अधिकारी प्रशांत भस्मे आपल्या गाण्याची आवड जपत अनेकविध कार्यक्रमात सहभागी होऊन आपले हुन्नर दाखवले आहे

पंढरपूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक पदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर सध्या नवी मुंबईत अस्थापनात असतानाही आपल्या व्यस्त कार्यातून वेळ काढून गायनाचा छंद जोपासत आहेत जुन्या जमान्यातील हिंदी चित्रपट गीतांपासून ते मराठी भावगीते व संतांचे अभंग ते सहजगत्या गातात.
या आवडीच्या गमकाविषयी विचारले असता त्यांनी सांगितले की माझ्या घरातच गायनाची आवड होती वडिल बंडू शंकर भस्मे, चुलते रमण,सुरेश व आत्या कुसुम मुळे सर्वच त्यावेळेस छान गाणी म्हणत असत मी लहान असल्याने त्यांची गाणी ऐकून गुणगुणत असे त्याकाळात मनोरंजनाचे एकमेव साधन म्हणजे रेडिओ असे.

हळूहळू वय वाढत गेल आणि कंठ फुटत गेला मी गाण्यात अडकत गेलो पुढे महाविद्यालयीन शिक्षणात स्नेहसंमेलनात भाग घेऊन गाण्याची आवड पूर्ण केली सर्वत्र कौतुक होत गेले त्यानंतर सन 1994 साली पोलिस सेवेत दाखल झाल्यानंतर कर्तव्यातील कामाची व्याप्ती सततचे काम यातून आजपर्यंत जोपासलेल्या छंदाकडे दूर्लक्ष होणार नाही याचे भान ठेवले मिळेल त्यावेळी गाणी ध्वनीमुद्रित केली व समाज माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचली त्यांनीही यास भरभरून प्रतिसाद दिला.
आतापर्यंत दूरदर्शनवरील “ताक धिना धिन” या कार्यक्रमात सन 1997 मध्ये सहभाग घेतला तसेच सन 2003 मध्ये मुंबई विविध भारतीवरील दर शनिवारी प्रसारीत होणारा कार्यक्रम “न कर्त्याचा वार शनिवार” यात भाग घेतला.
