पुणे (हवेलीनामा ऑनलाईन) ग्रह उद्योगात अनेक स्त्रियां आपल्या कौशल्याचा वापर करुन अनेक नवनवीन कलानिर्मिती करत असतात यातून त्यांना आर्थिक मदत होत असते अलीकडे महिला बचत गटांच्या माध्यमातून अशाच महिलांमधील कौशल्यांना वाव मिळावा या उद्देशाने अनेक विविध उपक्रम राबविले जात असतात यापैकीच थेऊर येथील पै दत्तात्रय उर्फ आबा काळे सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून ग्रामीण महिला सक्षमीकरणासाठी व त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजार भाव मिळावा यासाठी तीर्थक्षेत्र थेऊर येथे प्रत्येक महिन्यात चतुर्थीचे औचित्य साधून चिंतामणी महोत्सव आयोजित करण्याचा जो मानस प्रतिष्ठानने घेतला आहे हा निश्चितच उल्लेखनीय असा उपक्रम आहे असे प्रतिपादन बारामती टेक्स्टाईल इन्डस्ट्रीजच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी केले.
थेऊर हे अष्टविनायकांपैकी एक तीर्थक्षेत्र असून येथे राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक श्री चिंतामणी दर्शनासाठी येतात याच संधीचा फायदा परिसरातील महिला बचतगटांना व्हावा यासाठी सामाजिक बांधिलकीतून प्रतिष्ठानच्या माध्यमातून या बचतगटांना मोफत गाळे उपलब्ध करुन देण्यात येत आहेत हा अतिशय कौतुकास्पद उपक्रम असल्याचेही पवार म्हणाल्या.
या महोत्सवात सहभागी झालेल्या अंबिका उद्योगसमूहाच्या संचालिका कमलबाई परदेशी याची या महोत्सवाबद्दलची बोलकी प्रतिक्रिया आली त्या म्हणाल्या की,आबा काळे यांनी महिला बचतगटांना उभारी देण्यासाठी यातून प्रयत्न केला आहे यामुळे अनेक बचतगट सक्षम होतील तसेच या प्रतिष्ठाणच्या माध्यमातून निर्यातक्षम उत्पादने तयार करण्याचा माणस असल्याचे सांगितले.
यावेळी आमदार अशोक पवार,यशवंतचे माजी संचालक पांडुरंग काळे, बाळासाहेब चौधरी,पंचायत समितीचे माजी सदस्य हिरामण काकडे,पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्ष भारती शेवाळे,राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष दिलिप वाल्हेकर,उद्योजक बापूसाहेब शितोळे,कोरेगावचे सरपंच विठ्ठल शितोळे,कदमवाकवास्तीचे माजी सरपंच नंदकुमार काळभोर,हवेलीच्या महिला अध्यक्ष सुरेखा भोरडे,लोचन शिवले, माजी उपसरपंच दत्ताञय कुंजीर,राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय विभाग उपाध्यक्ष आंनद वैराट,राष्ट्रवादी महिला सरचिटणीस नम्रता कांबळे,ग्रामपंचायत सदस्य रुपाली रसाळ, नितिन लोखंडे,पांडुरंग काळभोर,गणेश सोसायटीचे चेअरमन एकनाथ काळे,माजी चेअरमन रमेश कुंजीर,सुखराज कुंजीर तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी पंचकृषीतील नागरिक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते
या महोत्सवात अनेक स्थानिक महिलांनी स्टाॅल मांडले होते त्याना भेट देऊन महिलांना प्रोत्साहन दिले.
