लोणी काळभोर (हवेलीनामा ऑनलाईन) हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती लोणी काळभोर, कदम-वाकवस्ती, कुंजीरवाडीसह मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त” विविध राजकीय पक्ष व गावातील स्थानिक मंडळांच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रम व उपक्रम घेण्यात आले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A) च्या पुणे शहर अध्यक्षा महिला आघाडी शशिकला वाघमारे व मिनाज मेमन इतर मान्यवर यांनी कदम-वाकवस्ती, पठारेवस्ती राजेसाहेब प्रतिषष्ठान येथे शिवजयंती निमित्ताने भेट दिली, व येथील कार्यकर्त्याचे अभिनंदन करून युवा नेते दत्तात्रय माणिक आंबूरे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या, या उपक्रमात राजेसाहेब प्रतिष्ठान मधील सर्वच कार्यकर्त्यांनी खूप उत्साहमध्ये नियोजन केले सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजे प्रयत्न लसीकरणं करण्यात आले नंतर भारतरत्न लता मंगेशकर यांना आदरांजली वाहून त्यांच्या सुरेख सुंदर संगीताचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला, तसेच २००० लोकांची अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली.यासाठी प्रवीण काळभोर, युवा नेते दत्तात्रेय आंबूरे,ग्रामपंचायत सदस्य नितीन लोखंडे,अमन शेख,युवराज आंबूरे,अक्षय बिराजदार,संतोष सल्ले,अल्ताफ शेख, संदेश शिंदे,राम भंडारी यांचे मोठे योगदान होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले त्या वेळी पंचयत समिती सदस्य सनी काळभोर,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष सीताराम लांडगे,शिवसेना हवेली तालुका प्रमुख प्रशांत काळभोर, मुंबई महापौर केसरी दत्तत्रय उर्फ आबा काळे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पंढरीनाथ नामुगडे, माजी सरपंच नंदकुमार काळभोर,माजी उपसरपंच ऋषिकेश काळभोर,मयुर कदम,सामाजिक कार्यकर्ते चित्तरंजन गायकवाड,पांडा काळभोर,सतीश काळभोर,मुकुल काळभोर,पंकज गायकवाड, मनोज काळभोर व इतर मान्यवर उपस्थित होते.
