पुणे (हवेलीनामा ऑनलाईन) कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर धार्मिक स्थळांच्या ठिकाणी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते आज थेऊर येथे संकष्टी चतुर्थीनिमित्त पुणे शहर व परिसरातील नागरिकांनी श्री चिंतामणी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली दर्शनबारी मंदिराबाहेर लांब पोहोचली व भाविकांना अक्षरशः उन्हात उभे राहण्यास भाग पडले.

       रविवार सुट्टीचा दिवस असल्याने दर्शनासाठी भाविकांची गर्दी होणार हे गृहीत धरुन दर्शनबारी चे नियोजन अपेक्षित होते येथे येणाऱ्या भाविकांना नेहमीच दर्शनासाठी मंदिराबाहेर रांगेत उन्हात आपल्या लहान मुलांना घेऊन उभे राहण्याची वेळ येते यासाठी कायमस्वरुपी दर्शनबारी सभामंडप तयार करणे आवश्यक असून गेली अनेकवेळा हा विषय उपस्थित झाला आहे भाविकांच्या सोयीकडे देवस्थानसह शासनाकडून लक्ष देणे अपेक्षित आहे.
       देवस्थान कडून केवळ मंदिरालगतच्या बोळीत नेट बांधून पायघड्या टाकल्या होत्या परंतु दर्शन रांग संपूर्ण मंदिराला वेढा घातलेली होती.
      पहाटे पाच वाजता राजेंद्र आगलावे यांनी महापूजा करुन देऊळ  दर्शनासाठी खुले केले सकाळी गर्दी थोडी कमी होती परंतु त्यानंतर यात वाढ होत गेली भर उन्हात  भाविक लांबच लांब रांगेत उभे असल्याचे चित्र दिसून आले.
       गर्दीवर नियंत्रण ठेवताना सुरक्षा रक्षकांना मोठी कसरत करावी लागली भाविकांकडून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत होता दर्शन बारीचे नियोजन लावताना खुपच दमछाक होत असल्याचे दिसले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *