पुणे (ऑनलाइन हवेलीनामा)  आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी पट्ट्यात दारू धंदयावर घोडेगाव पोलिसानी धडक कारवाई  करत पाच ठिकाणी हातभट्ट्या नष्ट केल्या. यात पाचशे लिटर कच्चे  रसायन, दारू बनविण्यासाठी वापरात येणारे नवसागर, गुळ जप्त करून नष्ट केला. ही कारवाई केवळ दारू भट्ट्यावर केली नाही तर  नवसागर व गुळ विकरणा-या दुकानदारांवरही गुन्हे दाखल केले आहे.
           घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी नुकताच घोडेगाव पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहेत आणि लगेच हातभट्ट्यावर कडक कारवाईचा बडगा उचलला आहे. डिंभे ते माळीणफाटा दरम्यान अडिवरे, माळीणफाटा, आंबेगाव वसाहत, कोकणेवाडी, नवलेवस्ती या पाच ठिकाणी जीवन माने यांच्या नेतृत्वाखाली, पोलिस हवालदार जालिंदर रहाणे, स्वप्नील कानडे यांनी कारवाया केल्या. अडिवरे वांदरवाडी येथे दारू पाडण्यासाठी जमिन पुरलेले आठ प्लास्टिक बॅरल बाहेर काढून नष्ट केले. त्यांच्या या कारवाईमूळे याभागातील दारू बनविणा-यांचे धाबे दणाणले आहेत.
           अडिवरे जवळ वांदरवाडी येथे १०० लीटर कच्चे रसायन व वीस नवसागराच्या वडया मिळून आल्या. याप्रकरणी दहा हजार पाचशे रूपयांचा माल बेकायदा व वीना परवानगीचा मिळून आल्याची तक्रार देण्यात आली आहे. यातील कच्चे रसायन जाग्यावरच  नष्ट करण्यात आले व दारू पाडण्यासाठी वापरात येणारे साहित्य फोडून टाकण्यात आले. याप्रकरणी यशवंत पवार याच्या विरूध्द व नवसागराच्या वाडया विकणारा संतोष जनरल स्टोअर अडिवरे या दुकानचा मालक जानकु तुकाराम शेळके यांच्या विरूध्द घोडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
      माळीण फाटया जवळ आमडे गावच्या हद्दीत १२५ लिटर कच्चे रसायन व २०  नवसागरच्या वडया मिळून आल्या. या प्रकरणी तेरा हजार रूपयांचा माल बेकायदा व विना परवाना मिळून आला. यातील कच्चे  रसायनचा माल नष्ट करून दारू पाडणारा दिनेश पांडुरंग मुकणे यांच्या विरूध्द व नवसागरच्या वडया विकणारा तांबोळी ट्ेडर्स अडिवरे येथील फिरोज हसन तांबोळी यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
        बोरघर गावच्या हद्दीत नवलेवस्ती येथे ११० लिटर कच्चे रसायन व २० नवसागरच्या वडया व एक किलो काळा गुळ सापडल्या. यात आकरा हजार पाचशे पन्नास रूपयांचा माल बेकायदा व विना परवाना मिळून आला. यातील कच्चे रसायान जाग्यावर नष्ट करण्यात आले. तसेच दारू पाडणारा मोतीराम सावळेराम वाघ याला ताब्यात घेण्यात आले. त्याने नवसागर व गुळ कोकणेवाडी मधून आणत असल्याचे सांगितले. यावरून कोकणेवाडीतील सहयाद्रि सुपर मार्केटवर धाड मारली असता  नवसागर व गुळ मिळून आला.  दुकानमालक ऋषीकेश दिगंबर कोकणे यांच्या विरूध्द सुध्दा गुन्हा दाखल करण्यात आला.
         शाश्वत संस्थेच्या आंबेगाव वसाहत येथे रहात असलेल्या कातकरी घरकुलांमध्ये १६० लिटर कच्चे रसायन, नवसागर व गुळ मिळून असा आठरा हजार पाचशे रूपयांचा माल मिळून आला. याप्रकरणी अंकुश पांडुरंग असवले, गणपत भागुजी मुकणे व सहयाद्रि सुपर मार्केट याच्यावर गुन्हा दाखल झाला.
        आंबेगाव पोलिसांनी गावठी दारूवर केलेली ही कारवाई नुसती हातभट्टी पुरती मर्यादित न राहता त्याच्या मुळापर्यंत गेल्याने परिणामकारक ठरली आहेत बऱ्याचवेळा ही हातभट्टीपर्यंत मर्यादित राहते नंतर काही दिवसात पुन्हा येरे माझ्या मागल्या याप्रमाणे चालू होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *