पुणे (हवेलीनामा ऑनलाईन) पुर्व हवेलीतील मुळा मुठा नदीत बेकायदा वाळु ऊपसा करणाऱ्या हवेलीच्या तहसीलदारांनी पाच अड्ड्यांवर छापे टाकून तिन पोकलेन मशीन व वाळु ऊपसा करणारी बोट जप्त केली या कारवाईमुळे पुर्व हवेलीतील वाळु माफियांना चांगलाच चाप बसला आहे.
8 अलिकडे मुळा मुठा नदीपात्रात अष्टापुर, हिंगणगाव, बिवरी भागातील वाळू माफिया बेकायदा वाळू ऊपसा करत हा उपसा रात्री बारा नंतर पहाटे सहा पर्यंत चालत असे यावर गेल्याच आठवड्यात तहसीलदार तृप्ती कोलते यांनी नदीपात्रातील वाळु ऊपसा करणार्या अड्ड्यांवर छापे टाकून कारवाई केली होती या भागात नदीपात्रातील वाळूचे लीलाव झालेले नसतानाही वाळू माफियाकडून रोज नदीचे लचके तोडत असल्याची माहिती हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांना मिळाली दिवसरात्र खुलेआम हा वाळु ऊपसा करत असल्याची माहिती समजली आज दुपारी अचानक कोलते यांनी मुळा मुठा नदी पात्रात कारवाई करण्याच्या दृष्टीने घटनास्थथळी पोहोचल्या तेंव्हा त्यांना अष्टापुर, हिंगणगाव, बिवरी तसेच या भागातील नदी पात्रात वाळु ऊपसा करण्यासाठी लागणारे साहीत्य तिन पोकलेन मशीन व वाळु ऊपसा करणारी बोट आढळली व वाळु ऊपसा करणारे माफिया कारवाईच्या भितीने पळून गेले तर हिंगणगाव येथे नदीपात्रातील वाळु ऊपसा करणारी बोट जप्त केली तहसीलदार तृप्ती कोलते यांनी मागील आठवड्यात केलेली कारवाई व आता केलेल्या या कारवाईमुळेवाळु माफियांचे धाबे दणाणले आहेत वाहनांच्या साहीत्याचे पंचनामे करुन लोणी कंद पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याबाबतचे आदेश दिले आहेत

