पुणे (हवेलीनामा ऑनलाईन) कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षापासून ग्रामीण संस्कृतीतील महत्वाचे आकर्षण असलेले गाव पातळीवरील यात्रा होत यामध्ये समाजातील सर्वच घटक सहभागी होतात.यात मोठी अर्थिक उलाढाल होत असेल विशेषतः छोटे व्यावसायिक यांना चांगली संधी असते हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे परंतु कोरोनाच्या प्रतिबंधामुळे हा व्यापारी हातघाईला आला होता तिसऱ्या लाटेची तिवृता कमी होत असताना यात्रांना हळूहळू सुरुवात झाली सध्या हा यात्रांचा मोसम चालू झाला असून पूर्व हवेलीतील गावांमध्ये ही धामधुम जोरात चालू आहे

थेऊर येथील ग्रामदैवत श्री महातारी आई देवीची यात्रा नुकतीच पार पडली यामध्ये पंचक्रोशीतील गावांमधून अनेक भाविकांनी श्री म्हातारी आई देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती हा उत्सव दोन दिवस चालतो माघ पौर्णिमेच्या दिवशी देवीचा नैवेद्य व रात्री पालखी सोहळा पार पडतो यामध्ये थेऊर येथील दोन नामांकित बँड सहभागी होतात यामध्ये सोलापूरकर यांचा प्रभात तर आगलावे बंधू यांचा भारत बँड हे या पालखी सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असते यामध्ये अनेक स्थानिक ग्रामस्थ सहभागी होतात हा पालखी सोहळा ग्राम प्रदक्षिणा पूर्ण करतो दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता ग्रामीण लोककलेचा बाज असलेली लोकनाट्य तमाशा कलावंतांचा कार्यक्रम पार पडतो यावर्षी तुकाराम खेडेकर सह पांडुरंग मुळे यांचा लोकनाट्य तमाशा आयोजित केला होता यावेळी ग्रामस्थांनी मोठा सहभाग नोंदवला तर सायंकाळी साडेचार वाजता मंदिर परिसरात कुस्त्यांचा जंगी आखाडा आयोजित केला यामध्ये पुणे जिल्ह्यासह सोलापूर, अहमदनगर, सांगली या जिल्ह्यातून नामवंत पैलवान आपली कला दाखवण्यासाठी दरवर्षी आवर्जून सहभागी होतात यावेळी उत्सव कमिटीच्या वतीने अतिशय शिस्तबद्ध अशा प्रकारचे या आखाड्याचे नियोजन केले होते पंच म्हणून थेऊरचे माजी सरपंच तात्यासाहेब काळे, पंचायत समितीचे माजी सदस्य हिरामण काकडे, माजी उपसरपंच विलास कुंजीर, मुंबई महापौर केसरी दत्तात्रय उर्फ आबा काळे, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल काळे,युवराज काकडे सुखराज कुंजीर यांनी काम पाहिले.

यावेळी थेऊरचे उपसरपंच आप्पासाहेब काळे,हवेली पंचायत समितीचे माजी सदस्य पोपट गायकवाड, जगन्नाथ बोडके, गणेश सोसायटीचे चेअरमन एकनाथ काळे,व्हाईस चेअरमन आण्णा भिसे,विठल काळे, माजी उपसरपंच शहाजी जाधव,यशवंत कुंजीर,शरद काकडे, आंनद वैराट, आण्णा बोडके, माजी सदस्य कुंडलिक कांबळे,सुरेश कांबळे, कैलास ढवळे, संपत बिनावत, गणेश रसाळ,आबा कांबळे,सुरेश चव्हाण,दत्ता तांबे,दादा लोंढे, विष्णू कांबळे आदी उपस्थित होते.लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अमित गोरे,पोलिस हवालदार विजय जाधव,बनकर,जगताप यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

