पुणे (हवेलीनामा ऑनलाईन) चित्रपटगृहामध्ये अनेक स्थित्यंतरे झाली असली तरीही आजही एक पडदा चित्रपटगृहाचा प्रेक्षक कायम आहे बहुपडदा चित्रपटगृहे अलिकडे मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहेत परंतु त्याचा प्रेक्षकवर्ग वेगळा आहे.

बहु पडदा चित्रपटगृहाची तिकिटे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असतात तर तो प्रेक्षक देखील वेगळा असतो तर एक पडदा चित्रपटग्रहाचा प्रेक्षक वर्ग वेगळा आहे गेली दोन वर्ष कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर एक पडदा चित्रपटगृहे बंद होती परंतु प्रदीर्घ कालावधीनंतर शहरातील एक पडदा चित्रपटगृहे सुरू होत असून शहरांमध्ये अलका, विजय, लक्ष्मीनारायण, श्रीनाथ, निलायम, प्रभात, व्हिक्टर, वसंत आदी एक पडदा चित्रपटगृहे शहराच्या मध्यवर्ती भागात आहेत परंतु गेली दीड ते दोन वर्ष ही बंद होती मध्यंतरीच्या कालावधीत 50% असन क्षमतेने चित्रपट गृहे सुरू करण्याची परवानगी दिली होती मात्र आसनक्षमता, सुरक्षितता, वाढती स्पर्धा आणि घटलेले प्रेक्षक यामुळे ही चित्रपटगृहे सुरू करता आली नाहीत दुसऱ्या लाटेनंतर नियम शिथिल झाल्यानंतर दिवाळीपासून पुण्यातील अलका थिएटर सुरू झाले व दोन वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर वसंत चित्रपटगृह आज पासून प्रेक्षकांच्या सेवेत रुजू होत असून येथे आज प्रदर्शित होणारा पावनखिंड हा मराठी चित्रपट प्रेक्षकांसाठी पाहायला मिळणार आहे वसंत मुळे सर्वसामान्य प्रेक्षकांना आणखी एक चित्रपटगृह उपलब्ध होत आहे याआधी अलका व व्हिक्टरी अशी दोन एक पडदा चित्रपटगृहे सुरू झाली आहे लवकरच इतर चित्रपटगृह देखील प्रेक्षकांच्या सेवेत हजर होतील अशी आशा आहे
