पुणे (हवेलीनामा ऑनलाईन) कोरोना महामारीच्या विळख्यातून बाहेर पडत असताना सर्वसामान्य माणसाला सध्या प्रचंड आर्थिक अडचणीना सामोरे जावे लागत असून याकडे दुर्दैवाने केंद्र अथवा राज्य शासनाचे लक्ष नाही सध्या केवळ एकच चर्चा म्हणजे घोटाळे जे थोडेथोडके नाही तर हजारो कोटींची,यामुळे सामान्य माणूस मात्र गोंधळला आहे कारण एवढा पैसा कोणाचा आहे आमचाच ना मग यावर हे घोटाळेबाज मजा मारत आहेत आणि ज्याच्यावर हे राखण्याची जबाबदारी दिली ते नेमके काय करताहेत?

आजपर्यंत आपल्या देशात अनेक घोटाळे बाहेर आले त्यातून जो पैसा लुटला त्याची भरपाई कशी व कोणाकडून घेणार कारण लोकांचे केवळ मनोरंजन करण्या इतकी ही घटना छोटी नाही हा सर्व देशवासियांचा पैसा आहे त्यामुळे सध्या पसरलेली महागाई ही याची परिणती म्हणायचे काय आशा प्रश्न निर्माण झाला आहे.
लवकरच येऊ घातलेल्या महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्य निवडणूक तोंडावर राज्यातील राजकारण तापले असून भाजप आणि महा विकास आघाडीतील संघर्ष वाढत चाललेला आहे या संघर्षातून सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे मात्र डोळेझाक केली जात असल्याचे स्पष्ट संकेत दिसत आहे सत्ताधारी व विरोधक यांच्यात चाललेली झुंज वरवर पाहता केवळ मनोरंजन या पलीकडे काहीच नसल्याचे सर्वसामान्यांच्या प्रतिक्रियेतून दिसून येत आहे दोन हातांना काम मिळवून देण्यासाठी कोणताही पक्ष इमानदारीने प्रयत्न करत असल्याचे सध्या तरी दिसून येत नाही मध्यम व रोजंदारी करणाऱ्या नागरिकांचे कंबरडे मोडले असून दैनंदिन जीवन कसे जगावे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मोठी उपाययोजना करणे अपेक्षित आहे
काल भाजप आणि शिवसेना यांच्यात जुंपलेल्या वाक् युद्धातून एकमेकावर आरोपांची चिखलफेक झाली यामध्ये संजय राऊत व किरीट सोमय्या यांच्यात चाललेल्या गेल्या काही दिवसातील आरोप-प्रत्यारोपात आता नारायण राणे व विनायक राऊत यांनीदेखील उडी घेतली त्यामुळे त्या दोन पक्षातील नेत्यांची हि झुंड किती दिवस चालणार आहे हे पहाणे औत्सुक्याचे आहे
