पुणे(ऑनलाइन हवेली नामा) कोरोना महामारीच्या काळात अनेक विकास कामांना खीळ बसली तरीही लोणी काळभोर गावच्या पदाधिकाऱ्यांनी दर्जेदार काम करून एक विकासाचे उदाहरण दाखवून दिले आहे असे मत शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी व्यक्त केले ते लोणी काळभोर ग्रामपंचायत, पंचायत समिती हवेली,पुणे जिल्हा परिषदे पुणे यांच्यावतीने केलेल्या 3 कोटी 2 लक्ष रु.च्या विविध विकास कामांचा व रामदरा रेल्वे उड्डाणपुलाचा लोकार्पण व उद्घाटन सोहळा आमदार अशोक पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महंत हेमंतपुरी महाराज १००८ (रामदरा शिवालय) हे कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी होते यावेळी हवेलीचे जेष्ठ नेते माधवआण्णा काळभोर वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी,प्रतापराव गायकवाड (मा.सभापती कृ.उ.बा.स.पुणे),. विलास काळभोर (मा.जि.प.सदस्य), शिवदास काळभोर (अध्यक्ष हवेली ता.कॉंग्रेस कमिटी), पै.राहुल काळभोर (महाराष्ट्र केसरी), सीताराम लांडगे (जिल्हाध्यक्ष पुणे जि.पत्रकार संघ), सुभाष काळभोर (मा.चेअरमन साधना सह. बँक), आण्णासाहेब काळभोर (मा.उपसरपंच लोणी काळभोर), सुनंदा शेलार (जि.प. सदस्या), युगंधर उर्फ सनी काळभोर (सदस्य, पं.स. हवेली), सरपंच राजाराम काळभोर , उपसरपंच. ज्योती अमित काळभोर, सदस्य .योगेश काळभोर, नागेश काळभोर, भरत काळभोर, गणेश कांबळे, सदस्या सविता लांडगे, प्रियंका काळभोर, ललिता काळभोर, माधुरी काळभोर, भारती काळभोर, रत्नाबाई वाळके, संगीता काळभोर, ग्रामविकास अधिकारी श्री.एस.एम. गायकवाड, समस्त ग्रामस्थ लोणी काळभोर व ग्रामपंचायत कर्मचारी वृंद उपस्थित होते.
आमदार अशोक पवार पुढे म्हणाले की, विकास कामे करत असताना स्थानिक नागरीकांना अनेक अडचणी येतात त्या अडचणी सोडविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधीनी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचले पाहीजे, महसूल विभाग, वन विभाग अथवा सामान्य प्रशासनातील कोणत्याही प्रकारची कामे असली तरीही ती तत्परतेने सोडविले जातील, खाजगी रुग्णालयात गरीब रुग्णांना मोफत उपचार मिळावे म्हणून शासनाने प्रत्येक रुग्णालयाला दहा टक्के मोफत उपचारासाठी योजनांची अंमलबजावणी व्हावी यासाठी यावी कायम प्रयत्न करत असून लाभ सर्वसामान्यापर्यंत पोहचली पाहिजे
पिएमआरडीने जमिनीवर टाकलेल्या आरक्षणावर शेतकऱ्यांकडून हरकती घेण्याचे काम चालु आहे हरकती संपल्यानंतर ज्या शेतकर्यांवर अन्याय झाला त्या शेतकर्यांसाठी शासनदरबारी न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असे प्रतिपादन आमदारांनी दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य नागेश काळभोर यांनी तर आभार योगेश काळभोर यांनी मानले तर सुत्रसंचालन माजी ऊपसरपंच राजाराम काळभोर यांनी मानले
“श्रीक्षेत्र रामदरा येथील रेल्वे उड्डाणपूलाचे काम शासकीय लालफीतीत अडकल्याने चार वर्षापासून उड्डाणपूलाचे काम बंद पडले होते त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागले अखेर हवेलीचे जेष्ठ नेते माधव काळभोर , सरपंच राजाराम काळभोर, ऊपसरपंच ज्योती काळभोर ,महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर ,पंचायत समिती सदस्य युगंधर काळभोर ,ग्रामपंचायत सदस्य नागेश काळभोर यांनी सतत पाठपुरावा केला खासदार अमोल कोल्हे व मी स्वतः वन विभाग, रेल्वे प्रशासन ,महसूल विभाग यांच्या बैठका घेतल्या येणार्या अडचणी सोडवून उड्डाणपूलाच्या कामाला सुरुवात झाली व दोनच महीन्यात या पुलाचे काम पूर्ण केले असल्याचे आमदार अशोक पवार यांनी यावेळी सांगितले
