पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) वाघोलीतील भैरवनाथ तलाव धोकादायक बनला असून यात अनेकांचे प्राण गेले आहेत त्यामुळे याच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे वाघोलीतील केवळ याच तलावावर अनेक महिला धुणे घेऊन येतात त्यावेळी आशा घटना घडत आहेत आज दुपारी अशीच एक घटना घडली यामध्ये नऊ वर्षांची मुलगी बुडाली सोनाक्षी विजय राखपसरे,वय-९ वर्षे(रा.बुरुंजआळी,इंदिरानगर) असे मृत्युमुखी पावलेल्या मुलीचे नाव असून,ती आज दुपारी ३ च्या सुमारास मोठी बहिण सुनीता हिच्यासोबत भैरवनाथ मंदिर तलावावर कपडे धुण्यासाठी गेली होती.मोठी बहिण तलावालगतच्या पायरीवर कपडे धूत होती असताना सोनाक्षी जवळच निसरड्या पायरीवरुन घसरुन तलावात पडली.
यावेळी तिला वाचवण्यासाठी गोंधळून आरडाओरडा केला.परंतु,परिसरात आजुबाजुला बसलेले नागरिक व कपडे धुण्यासाठी असलेल्या महिला घाबरून पुढे गेल्या नाहीत.या घटनेची पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या अग्निशमन विभागाला माहिती मिळताचं वाघोली उपस्थानक आधिकारी विजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली चालक,जवान संदीप शेळके,अक्षय बागल, मुस्ताक तडवी, चेतन खमसे, विकास पालवे,ओम पाटील,अभिजित दराडे यांनी तलावात उतरुन मुलीचा शोध घेतला.तसेच लोणीकंद पोलीस व स्थानिक ग्रामस्थ ही शोधकार्यात सहभागी झाले होते, साधारण ४ तासाच्या प्रयत्नानंतर सायंकाळी ६.३० वाजता मुलीचा मृतदेह हाती लागला.
