पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) मोकळ्या प्लॉटवर वीज जोडणीसाठी विद्युत रोहित्र मंजुरी साठी वरिष्ठ कार्यालयास अंदाजपत्रक तयार करून पाठविण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या उप कार्यकारी अभियंत्याने २० हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले.
महावितरणच्या उरुळी कांचन येथील कार्यालयाचे उप कार्यकारी अभियंता प्रदीप वासुदेव सुरवसे याने इलेक्ट्रिक ठेकेदाराला ग्राहकाच्या मोकळ्या प्लॉटवर रोहित्र जोडणी हवी होती त्यासाठी अहवाल तयार करून अंदाजपत्रक तयार करायचे होते त्यासाठी सुरवसे याने २५ हजार रुपयांची मागणी केली होती त्यावर तडजोड करून वीस हजार रुपयांवर काम करण्याचे मान्य केले यावर त्या ठेकेदाराने लाचलुचपत विभागाकडे याची रीतसर तक्रार केली त्यावर या विभागाने पडताळणी करून उरुळी कांचन येथे सापळा रचला आणि सुरवसे यास २० हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
त्याच्याविरुद्ध लोणी काळभोर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव सूहास नागगौड यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत विभागाने केली.
पुढील तपास पोलीस उप अधिक्षक सीमा अडनाईक करीत आहेत.
