पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) शिक्षण राज्य मंत्री बच्चू कडू यांना चांदूरबाजार न्यायालयाने दोन महिन्याची सश्रम कारावासाची शिक्षा व दहा हजाराचा दंड ठोठावला आहे कडू यांनी सन २०१४ च्या निवडणुकीत मुंबईतील दोन सदनिकांची माहिती दडवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे या निर्णयाला वरच्या न्यायालयात दाद मागण्यात येईल असे त्यांनी सांगितले

सन २०१४ च्या निवडणुकीत बच्चू कडू यांनी अचलपूर मतदार संघातुन उमेदवारी अर्ज दाखल केला होता व ते निवडूनही आहे होते परंतु त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मुंबईतील दोन सदनिकांची माहिती दिली नव्हती त्यामुळे भाजपचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील आसेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती यावर चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयात सुनावणी झाली यात लोकप्रतिनिधी कायदा कलम १२५ अ नुसार गुन्हा सिध्द झाला व चार वर्षांनंतर काळ निकाल जाहीर झाला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *