पुणे (हवेलीनामा ऑनलाइन)  खुनाच्या गुन्ह्यात जामीनावर सुटलेल्या आरोपीचा व त्याच्या वडीलांचा निर्घृण खुन करुन लोणीकंद परिसरात दहशत माजविणारा गुन्हेगार व एस.एस. गॅगचा स्वयंघोषीतत म्होरक्या निखील देवानंद पाटील, व त्याचे इतर २३ साथीदारांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
       लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,   टोळी प्रमुख निखील देवानंद पाटील  व त्याचे साथीदार यांनी लोणीकंद येथे एस.एस.गैंगचा म्होरक्या सचिन नानासाहेब शिंदे याचा खुन करणा-्या आरोपीचा बदला घेण्याराठी दि १२ जानेवारी रोजी
लोणीकंद भागात सायंकाळच्या वेळेस घातक हत्यारांचा वापर करुन सनी कुमार शिंदे व कुमार मारुती शिंदे यांचा खुन करुन लोणीकंद परिसरात दहशत माजवली होती यासंदर्भात लोणीकंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल
गुन्ह्यामध्ये अटक आरोपी विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ ये कलग ३ (1(i), ३(२), ३(३), ३(४) अन्वये मान्यता मिळावी यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांचे गा मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजेश तटकरे यांनी पोलीस उप आयुक्त परिमंडळ o४ पुणे
रोहीदास पवार, यांचे मार्फत अपर पोलीस आयु्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे नामदेव चव्हाण यांना प्रस्ताव
सादर केला होता या प्रस्तावाची छाननी करुन टोळी प्रमुख निखील देवानंद पाटील, व त्याचे २३ साथीदार
৭)नानासाहेब बाबुराब शिंदे, २)आशुतोष नानासाहेब शिंदे, ३)शुभम रामचंद्र वाबळे, ४)ऋग्वेद ऊर्फ छकूल्या
जालिंदर वाळके, ५)माऊली ऊर्फ केतन रामदास कोलते, ६)ऋतिक महादु किनकर, ७)अभिषेक रविंद्र गव्हाणे,
८)प्रतिक अनिल कंद, ९)ऋषीकेश सत्यवान आरगडे,१०) शुभम ऊर्फ मोन्या अशोक भंडारे,११) आलोक महादेव
सुर्यवंशी,१२) अभिषेक भानुदास लंघे, १३)ओंकार सुनिल इंगवले,१४) गणेश अशोक भालेराव,१५) अथर्व अंकुश कंद, १६)गणेश रामकिसन राऊत, १७) दिपक रंगु राठोड, १८)रोहन रुषीकेश गायकवाड, १९) रवि धोडींराम चव्हाण,२०) प्रतिक दिलीप तिजोरे, २१)अक्षय बापुराव गिरीमकर, २२)निलेश जितेंद्र काळे,२३) निखिल नितीन जगताप यांचे विरुष्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्या अन्वये
कारवाईस मंजुरी दिली.
 पुढील तपास सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग पुणे किशोर जाधव हे करीत आहे.
           ही कामगिरी अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त पुणे शहर,डॉ रवींद्र शिसवे सह पोलीस आयुक्त
पुणे, नामदेव तांबे अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग,रोहिदास पवार पोलीस उपआयुक्त परिमंडळ ०४ पुणे,किशोर जाधव सहा, पोलीस आयुक्त येरवडा विमाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणीकंद पोलीस स्टेशन गजानन पवार, पोलीस निरीक्षक गुन्हे राजेश तटकरे, पोलीस निरीक्षक मारुती पाटिल, पोलीस उप निरीक्षक श्रीकांत टेमगिरे, व सर्व्हेंन्स पथकातील पोलीस नाईक प्रशांत कापुरे, सागर कडु यांनी केली आहे.
    मोक्का अंतर्गत केलेली सन २०२२ या चालु वर्षातील चौथी व एकुण ६८ वी कारवाई आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *