पुणे (हवेलीनामा ऑनलाइन)  जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी राज्य शासनाने वाइन विक्री संदर्भात घेतलेल्या निर्णयावर पुनःच विचार करावा आणि हा निर्णय रद्द करावा अशी मागणी केली होती परंतु शासनाकडून यावर कोणतीही हालचाल होत नसल्याने आज अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्मरणपत्र दिले असून  येत्या१४ फेब्रुवारी पासून आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे त्यात सांगितले.राळेगणसिद्धी येथील संत यादवबाबा मंदिरात हे उपोषण करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले, राज्यातील ३६ जिल्ह्यातील भ्रष्ट्राचार विरोधी जनआंदोलन च्या कार्यकर्यांना बोलावण्यात आले आहे.

      महाराष्ट्र सरकारने शेतकरी हितासाठी वाइनची सुपर मार्केट तसेच किराणा दुकानातून विक्री परवानगी देण्यात आली यावर राज्यात मोठा गदारोळ निर्माण झाला विशेषतः महिला वर्गाकडून याचा निषेध केला जात आहे तसेच सामाजिक संस्था यांनी यावर विरोध दर्शविला आहे.
      यानाट्यात वाइन ही दारू नाही अशी स्पस्टोक्ती देण्यात आली यावरही अनेक प्रतिक्रिया आल्या वाइन ही दारू नसेल तर ती काय आहे अशी विचारणा केली यात जेष्ठ सामाजसेवक अण्णा हजारे यांनी या निर्णयाविरुद्ध प्रतिक्रिया देत हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी केली होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *