पुणे (हवेलीनामा ऑनलाइन)
रांजणगाच एम.आय डी सी, परिसरामध्ये लॉकडाऊननंतर मोटार सायकल चोरीच्या घटनेत वाढ झाली होती. त्यामुळे पोलीस अधीक्षक यांनी पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे यांना मोटार सायकल चोरावर आळा घालणे बाबत सुचना दिल्या.
 त्यानुसार पोलीस निरीक्षक मांडगे यांनी रांजणगाव एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे, सहा.फौज. दत्तात्रय शिंदे, पो.हवा. वैभव मोरे, पो.कॉ.विजय शिंदे, पो.को.उमेश कुतवळ, पो.को.रघुनाथ हाळनोर यांना मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शक सुचना दिल्या या पथकाने रांजणगाव एम.आय.डी.सी. परिसरात वेषांतर करून सापळा
लावून, सी.सी.टी.व्ही. फुटेज चेक करून तसेच गुप्त बातमीदारांशी संपर्कात राहुन मोटार सायकल चोरांना पकड़ण्याचा चंग बांधला, त्यानुसार गुप्त बातमीदारांकडून तपास पथकास माहिती मिळाली की, रांजणगाव येथील संशयीत नामे १) सुनिल आनंदराव मोरे यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्याने व त्याचा साधीदार २) अजयसिंग कुंदनसिंग बोरा, रा.रांजणगाव याचेसह रांजणगाव, शिकापुर परिसरात मोटार सायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली असुन दोन्ही त्यांच्याकडुन ०८ मोटार सायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत. तसेच ३) विशाल खंडु पवार, रा.वडगाव सावता, जि.अहमदनगर, हा देखील रांजणगाव परिसरात मोटार सायकल चोरी करत असल्याची बातमीदारांकडुन गोपनीय माहिती मिळाली असता त्यास गुन्हयामध्ये अटक करून त्याच्याकडे तपास केला असता त्याच्याकडुन एकुण ०७ मोटार सायकल जप्त करण्यात आल्या. तसेच ४) पवन तेजराव काकड, ५) आकाश भाकरे, दोन्ही रा.मोरगाव भाकरे, ता.जि.अकोला यांचेकडुन ०२ मोटार सायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत. ६)रमेश भिमराव पवार, रा.लिंगनुर, ता.मिरज, जि.सांगली यांच्याकडून एकण ०४ मोटार सायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत. सदर जप्त मोटार सायकलींपैकी शिरूर
पोलीस स्टेशन कडील ०२, शिकापुर पोलीस स्टेशन कडील ०२, नारायणगाव पोलीस
स्टेशन कडील ०१, कोतवाली पोलीस स्टेशन अहमदनगर कडील ०१, सोलापुर पोलीस
स्टेशन कडील ०१ व रांजणगाव एम . आय.डी.सी. पोलीस स्टेशन कडील १५ मोटार सायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत.
     यांची गुन्हा करण्याची पध्दत हि विशेषतः हिरो होन्डा मोटार सायकलचे हन्डल लॉक तोडुन चोरी करून चोरीच्या मोटार सायकल विनाकागदपत्रांच्या अल्प किंमतीमध्ये ग्रामीण भागात विकी करून कागदपत्रे दिल्यावर बाकीचे पैसे घेवुन जातो असे
सांगुन मोटार सायकलचची विकी करत असल्याचे निदर्शनास आले आहे
        रांजणगाव एम.आय डी सी. पोलीस स्टेशन हद्दीतील शिक्रापुर, शिरूर, नारायणगाव,
कोतवाली पोलीस स्टेशन अहमदनगर, व सोलापुर पोलीस स्टेशन हदुदीतील अशा एकुण
२२ मोटार सायकल हस्तगत करण्यात आलेल्या असुन त्यांचेकडुन एकुण २२ गुन्हे उघडकीस आले आहेत.
     ही कामगिरी पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय अधिकारी,दौंड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे, पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे, सहा फौज दत्तात्रय शिंदे, पो.हवा, वैभव मोरे, मो.कॉ.विजय शिंदे, पो को रमेश कुतवळ, पो.को.रघेनाथ हाळनोर, पो.हवा. विलास आंबेकर, पो.हवा. संतोष औटी, पो.हवा.
विजय सरजिने, यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *