पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) हवेली तालुक्यातील मुळा मुठा नदीतून अवैध वाळू उपसा गेली काही दिवसांपासून चालू होता यावर महसूल विभागाने कारवाई केली आणि उपशासाठी वापरण्यात येणाऱ्या सामुग्री ताब्यात घेण्यात आल्या मध्यरात्री तहसीलदार नदीपात्रात उतरून ही कारवाई केल्याची माहिती मिळत आहे

       गेल्या काही वर्षांत वाळूचे लिलाव झालेले नाहीत परंतु वाळू माफियाकडून अवैधरित्या उपसा चालू असतो साधारण दिवाळीनंतर याला सुरुवात होते सुरुवातीला थोड्या प्रमाणात वाळू काढली जाते परंतु नंतर त्यात भर पडते अलीकडे हवेलीतील कोलवडी,अष्टापूर आशा अन्य गावात ही वाळू उपसली जात होती याची कुणकुण महसूल विभागास लागली गेल्या काही दिवसांपूर्वी तलाठी यांनी पाहणी केली होती परंतू सोमवारी मध्यरात्री तहसीलदार यांनी कारवाई केल्याची माहिती मिळाली आहे.
        वाळूला सोन्याची किंमत आली असल्याने ही तस्करी केली जाते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *