पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) जागतिक अर्थव्यवस्थेत भांडवली व कृषी क्षेत्राचा वाटा असतो त्यात विकसित देशात भांडवली उत्पादनाचा वाटा सर्वाधिक तर शेती उत्पन्न जेमतेम परंतु भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून शेती व्यवसायाचे महत्व आहे.भारतीयांच्या नसानसात शेती भरलेली, परंपरागत शेती पासून ते आजच्या आधुनिक शेती पर्यंत या व्यवसायाचा अविभाज्य घटक म्हणजे बैल होय. शेतीतील सर्व कामे करण्यासाठी या जोडीदाराची गरज भासते परंतु हा जिवलग सहयोगी केवळ शेतीसाठी नाही तर घराची शान ठरतो जेंव्हा तो एखाद्या स्पर्धेत सहभागी होतो.

कोरोनामुळे सर्व जग थांबले उद्योग धंदे थंडावले केवळ जगण्याची भ्रांत निर्माण झाली त्यावेळी शेती व्यवसायाने आधार दिला आणि यात मोलाची साथ देणाऱ्या बैलाचा,अशा अविभाज्य घटक असलेल्या हवेलीतील बैलाच्या ऑनलाइन रॅम्प वाँँक स्पर्धेचे आयोजन पै दत्तात्रय उर्फ आबा काळे सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले होते त्याचा पारितोषिक वितरण सोहळा शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.यावेळी यशवंतचे माजी संचालक पांडुरंग काळे,हवेली तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, पंचायत समितीचे सभापती टिळेकर,माजी उपसभापती तथा सदस्य युगंधार काळभोर,माजी सदस्य हिरामण काकडे, कुंजीरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे, उद्योजक बापू शितोळे,महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड,प्रतिष्ठाण चे संस्थापक दत्तात्रय काळे, बाबासाहेब काळभोर, संतोष कांचन,कोलवडीचे माजी उपसरपंच दिलीप उंद्रे,नागेश काळभोर,सुनील कदम, आनंद वैराट,ज्ञानोबा कुंजीर,आनंद तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.
या रॅम्प वाँँक स्पर्धेत पहिले पारितोषिक हवेलीचा सर्जा राजा हा खिताब व स्मृतिचिन्ह देऊन वडकी गावचे बैलगाडा मालक पै धनंजय शेवाळे यांना सन्मानित करण्यात आले.तसेच दुसरे पारितोषिक कोलवडीचे गाडा मालक समीर उंद्रे व तिसरे पारितोषिक केसनंद येथील श्री माऊली हरगुडे यांना सन्मानित केले.
या स्पर्धेत काही उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली त्यात कैलास गायकवाड (वडकी),इंद्रजित खुंटवड (फुरसुंगी),साइराज कोतवाल (आष्टापूर),वेदांत तांबे (उरुळी कांचन),नानासाहेब झांबरे (होळकरवाडी)
