पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) या पृथ्वीवर लाखो जीवजंतू रहिवास करतात त्यात मानव एक आहे परंतु त्याला असे वाटते की हे सर्व केवळ आपल्यासाठी बनवलेलं आहे तर तसे नाही येथील प्रत्येकाला आपल्या पद्धतीने जगण्याचा अधिकार आहे मानवाने इतर पशु पक्षी यांच्या जीवनक्रमावर नेहमीच अतिक्रमण केलय त्यात हे निष्पाप प्राणी पक्षी आपला जीव गमावतात
        शासनाने चायनीज मांजा वापरण्यावर बंदी घातली असली तरीही बाजारपेयहात तो सहज उपलब्ध होतो आपला पतंग कापला जाऊ नये म्हणून या मांजाचा वापर होतो अनेकदा पतंग कापला गेल्यावर तो मांजा झाडावर, उंच विद्युत टॉवर वर अडकून पडतो याकडे आपण दुर्लक्ष करतो परंतु यामध्ये उंच आकाशात विहार करणारे पक्षी अडकून पडतात त्यांना त्यातून सुटका करून घेता येत नाही केवळ आपल्या मदतीशिवाय ते शक्य होत नाही परिणामी अनेक पशु पक्षी आपला जीव गमावतात या पक्षांना जीवदान देण्यासाठी द अल्पीनिस्ट संस्थेतील अक्षय शेलार हे गेल्या सात वर्षापासून साप,घारी, घुबड तसेच अन्य वन्यजीव वाचवण्याचे प्रयत्न करत आहेत रोज नवीन काहीतरी बघायला आणि शिकायला  मिळते  आपल्या पुणे शहरांमध्ये काहीजण पतंग उडवतात पण पतंग उडवताना हे लक्षात येत नाही की त्याची शिक्षा सुद्धा कोणाला तरी मिळू शकते, पतंग उडवताना हे आपल्या लक्षात येत नाही पतंग ज्यावेळेस कट होते आणि त्याच्यासोबत जो धागा असतो त्याचे पुढे काय होतं, कधी कधी कट झालेल्या पतंग पकडण्याची लहान मुलांची धडपड असते आणि जी पतंग खूप उंचावर असते ते कुठेतरी झाडावर, इमारतीवर पडते आता सिमेंटच्या जंगलात पक्षांसाठी झाडेच आसरा आहेत त्यावर मांजा अडकलेला असतो त्यामुळे घार, कावळा, कबूतर, आणि विविध प्रकारचे पक्षी मांजामध्ये अडकून पडतात अक्षयने एकाच दिवशी चार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे अडकलेले पक्षी सोडवले, पक्ष्यांना स्वतःला काहीच करता येत नाही, आपल्या मदतीशिवाय ते तेथे लटकून मरण पावलेले सुद्धा पाहण्यात येताात त्यांच्या चोचीने सुद्धा तो मांजा तुटत नाही असा मांजा का वापरावा ?कदाचित आपण बातमीत वाचलेले आहे की या मांजाने माणसांचे सुद्धा गळे कापून जखमा झाल्या आहेत तर जीव सुद्धा गमवावे लागले आहेत पक्षी तर परावलंबी पडतात व अजून अडकत जातात त्यांना सोडवण्यासाठी अक्षय सारख्या पक्षीमित्रांना बोलविण्यात येते आणि ते शेवटपर्यंत प्रयत्न करतात पण कधीकधी खूप उंच झाडाच्या टोकाला पक्षी अडकलेला असतो त्यामुळे खूप अडचणींना सामना करावा लागतो त्यासाठी कधी अग्निशामक दलाची मदत घ्यावी लागते आणि त्याला सोडण्यात येते अडकलेले पक्षी सोडवणे हे कार्य वर्षभर सुरू असते यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक मदत सुद्धा करत असतात पण आपण धोकादायक चायनीज मांजा न वापरता साधा मांजा वापरला तर त्याचे प्रमाण कमी होईल ज्या वेळेस पक्षी काढतोय त्यावेळेस काही पक्षी असे पण सापडतात की ते परत कधी आकाशात उडू शकत नाही याचं दुर्दैव कायम मनात राहते तुम्हाला आग्रहाची विनंती की तुम्हाला कधीही  पक्ष्यांचा रेस्क्यू करण्याची परिस्थिती आढळल्यास त्वरित अक्षय शेलार यांच्याशी  9764881313 या क्रमांकावर  संपर्क करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *