पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या उत्तर प्रदेश निवडणुकीत आता रंग भरू लागले आहेत आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर मतदारसंघात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते
उत्तर प्रदेशची निवडणूक ही सर्वार्थाने गाजत असून अनेक उलथापालथ चालू आहे योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री व आमदार भाजप सोडून समाजवादी पक्षात गेले तर भाजपनेही मुलायमसिंगांची सून आपल्याकडे वळवून घेतली त्यामुळे सर्वत्र निवडणूकीचा धुराळा उडताना दिसतो आहे

सत्ताधारी भाजप आपला विकासाचा नारा घेऊन अनेक प्रकल्प पूर्ण केल्याचे तसेच गुंडाराज मुक्त एजेंड पुढे ठेऊन निवडणूकित आपली बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न करत आहे तर विरोधकांनी आपली कंबर कसली आहेच त्यामुळे मतदार नेमकी कोणाची बाजू घेतात हे मार्च महिन्यात कळेल
