पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) शेतकऱ्याच्या मालाला योग्य किंमत मिळावी यासाठी राज्यातील किराणा मालाचे दुकान तसेच सुपर मार्केट मध्ये वाईन विक्रीसाठी राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे या दुकानात विकले जाणारी वाईन संपूर्णतः राज्यात उत्पादित तच असेल असे शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे
राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने द्राक्ष उत्पादनावर संशोधन करून निर्माण होणारी वाईन खुल्या मार्केटमध्ये विक्री करण्याची मुभा दिली असून सुपर मार्केट तसेच किराणामालाच्या दुकानात वाईन विक्री करण्याची परवानगी देण्यात आली आहे यासाठी त्या दुकानाचे क्षेत्रफळ कमीत कमी एक हजार चौरस फुटाची असले पाहिजे अशी अट याद घालण्यात आलेली आहे
यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली असून शासनाचा हा निर्णय म्हणजे राज्याला मद्यराष्ट्र बनविण्याचा हा निर्णय असल्याचा हा डाव आहे तसेच काही उद्योजकाच्या भल्यासाठी एक अर्थपूर्ण व्यवहार असल्याची टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.ही नेमकी चर्चा राज्यात केली की परदेशात झाली हे स्पष्ट करावे अशी मागणी त्यांनी केली.
