पुणे (हवेलीनामा वृत समूह) आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी असंख्य स्वातंत्र्य सेनानी प्राणपणाने लढले त्यांच्या बलिदानामुळेच आज आपण स्वातंत्र्याची फळ चाखत आहोत या स्वातंत्र्य सेनानींना आपण कायम स्मरणात ठेवतो परंतु राष्ट्रीय सणांच्या दिवशी विशेष आठवण काढतो.

प्रत्येक भारतीयांच्या हृदयात तिरंग्याबद्दल आदरभाव आत्मीयता आहे स्वातंत्र्यदिनी तसेच प्रजासत्ताक दिनी शासकीय कार्यालयावर हा तिरंगा दिमाखात फडकतो परंतु देशातील सामान्य नागरिक देखील हा सोहळा आपापल्या परीने साजरा करतो लहानग्या मंडळीना तर ही पर्वणी वाटते त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बोलके असतात.
समाज माध्यमावर अशीच एक चित्रफीत नजरेस पडली यात एक भारतीय महिला आपल्या झोपडी समोर तिरंगा ध्वज फडकावते यावेळी तेथे अनेक छोटी मुले पहावयास मिळतात परंतु केवळ एक ते दीड वर्षांचे बाळ त्यावेळी जो आनंद अनुभते त्याची तुलना कुठल्याही आनंदासोबत होऊ शकत नाही कारण ते निरागस बाळ आपल्या आनंदात रमून गेले आहे.आणि ता महिलेची परिस्थिती पाहिली तर आपण खूप सुधारणा केली अस म्हणत असल्याचा विचार करायला लावणारी आहे ते चित्रीकरण कोणत्या प्रांतातील आहे हे सांगने अवघड असले तरी राष्ट्रप्रेम अगदी भरभरून अनुभवास येत आहे
