पुणे (हवेलीनामा ऑनलाईन) संवेदनशील व बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले महान साहित्यिक कला यात्री,मुक्तांगांचे संचालक डॉ. अनिल अवचट यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले डॉ अवचट यांनी व्यसनमुक्तीची चळवळ नेटाने चालवली मुक्तांगण संस्थेच्या माध्यमातून तरुणांना व्यसनापासून मुक्त करण्यासाठी मोठे कार्य केले
अलीकडे तरून व्यसनाधीनतेकडे अधिक वळत असून त्यांना यापासून परावृत्त करण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले त्यांनी साहित्य क्षेत्रात भरपूर लिखाण केले त्यांचे लिखाण प्रामुख्याने मजूर दलित शोषित यांच्यावर केंद्रित आहे
त्यांना ओरेगामी कलेची खूपच आस्था होती ते तासनतास यात रमून जात त्यांनी या कलेच्या माध्यमातून अनेक कलाकृती बनवल्या. त्यांनी प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी शिकण्याची तयारी ठेवली
