पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) हिंदवी स्वराज्य संस्था या मार्फत चालविण्यात येणाऱ्या अन्नछत्र परिषदेच्या माध्यमातून हडपसर व पुणे शहराच्या विविध भागातील रस्त्यावर असणाऱ्या गोरगरीब व दीन दुबळ्यांना पोटभर अन्न मिळावे यासाठी कार्य चालू आहे, यासंकल्पनेतून अन्नछत्र परिषदेची स्थापना करण्यात आली या परिषदेच्या माध्यमातून आज पर्यंत सोळाशे दिवस अविरत ही अन्नदान सेवा चालू असून यात अनेक दानशूर नागरीकचा सहभाग लाभला आहे हडपसर येथील स्मित सेवा फाउंडेशनच्या संस्थापिका कथा भाजपा ओबीसी आघाडीच्या शहर उपाध्यक्षा स्मिता गायकवाड यांची नुकतीच या परिषदेच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांना हे नियुक्तीचे पत्र उद्योजक राहुल तुपे, नगरसेवक मारुती तुपे, अभिजीत बोराटे, जीवन जाधव व संजय हरपळे यांच्या हस्ते देण्यात आले यात परिषदेचे प्रवीण टिळेकर व्यंकटेश भंडारी सुधीर गांगट यांनी हे निवडीचे पत्र दिले.
स्मिता गायकवाड यांचे हडपसर व परिसरातील सामाजिक कार्याचा चढता आलेख व समाज कार्याबद्दल असलेली तळमळ पाहून अशा व्यक्ती अन्नछत्र असतील तर अधिक लोकांपर्यंत ही सेवा पोहोचविता येईल म्हणून त्यांची संचालकपदी निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
या अन्नछत्र परिषदेमार्फत हडपसर तसेच शहरातील प्रत्येक चौकात यामध्ये स्वारगेट पुणे स्टेशन ससून रुग्णालय शिवाजीनगर कोथरूड अशा विविध भागात उत्पात वर असलेल्या गोरगरीब अपंग वृद्ध व अनाथ गरजूंना या उपक्रमाच्या माध्यमातून दररोज दोन चपाती भाजी भात असे पोटभर जेवण दिले जात आहे आतापर्यंत नऊ लाख गरजूंना या माध्यमातून जेवण पोहोचविले आहे तर मागील आठवड्यापासून शहरांमध्ये आलेल्या मराठवाडा विदर्भातील एमपीएससी परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांना हे जेवण पोहोचविण्याचे काम चालू आहे
