पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) गेल्या अनेक वर्षात अनुभवास न आलेल्या कडाक्याच्या थंडीने राज्य गारठून गेले असून अनेक ठिकाणी पारा १० अंशाच्या खाली घसरला आहे हवामान खात्याने ही लाट आणखी चार दिवस टिकून राहणार असल्याचे सांगितले आहे.
यावेळी पावसाळ्यात भरपूर पाऊस पडला त्यानंतर हिवाळ्याची चाहूल लागली दिवाळी दरम्यान पुन्हा वादळं आली त्यामुळे दमट वातावरण निर्माण झाले गेल्या काही वर्षात हिवाळ्याची तीव्रता कमीच होती परंतु यावर्षी मात्र थंडीचा मोसम टिकून असून यात वाढ होत राहिली दरवर्षी डिसेंबर व जानेवारी महिन्यात साधारण थंडी असतेच परंतु यावर्षी हा पारा सातत्याने घटत गेला आहे आणखी यात घट होऊन तो ३ अंशावर येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हवामानात होत असलेल्या बदलामुळे अनेक आजार जडत आहेत मुख्यतः सर्दी, खोकला, ताप याचे मोठया प्रमाणात रुग्ण आहेत दवाखाने गच्च भरलेले आहेत
