पुणे (हवेलीनामा ऑनलाइन)  कोरोना महामारी च्या काळात अनेक कोरोना योद्ध्यांनी महत्त्वाची कामगिरी केली यात अनेकांना कोरोना संसर्ग होऊन ते मृत्युमुखी पडले त्यांना राज्य शासनाने पन्नास लाख रुपये मदतीचे घोषणा केली होती पुणे येथील पर्वती दर्शन परिसरातील अंगणवाडी केंद्र क्रमांक ११७ अंगणवाडी सेविका सविता प्रभाकर शिळीमकर यांचे कर्तव्य बजावत असताना दिनांक १४ एप्रिल २०२१ रोजी मृत्यू झाला यावर बाल विकास प्रकल्प अधिकारी सुहिता आनंद ओव्हाळ यांनी तसेच मुख्य सेविका कल्पना चीर मुल्ला यासाठी पाठपुरावा करत एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांचे आयुक्त यांच्याकडे अंगणवाडी सेविका शिळीमकर यांच्या पाल्यांना सानुग्रह सहाय्य निधी मिळावा यासाठी प्रस्ताव सादर केला होता या प्रस्तावावर दिनांक ६ ऑक्टोबर २०२१ रोजी मान्यता देण्यात आल्यानंतर हा ५० लाखाचा निधी बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रकल्प १, पुणे या कार्यालयास हा निधी दि १२ ऑक्टोबर २०२१ रोजी वितरित करण्यात आला त्या सानुग्रह अनुदानाचे वितरण आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने अंगणवाडी सेविका शिळीमकर यांच्या पाल्याना मुलगी अंकिता व मुलगा आकाश शिळीमकर यांना महिला व बालविकास आयुक्त सुहास मोरे यांच्या हस्ते वितरित करण्यात आला यावेळी महिला व  बालविकास चे उपायुक्त  बी एल मुंढे,उपयुक्त दिलीप हिवराळे,सुहिता ओव्हाळ,सहाय्यक आयुक्त मनीषा बिरासिस,बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयातील मुख्यसेविका कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

          यावेळी त्या पाल्याना अश्रू अनावर झाले कारण ही दोन्ही भावंडे लहान असताना वडिलांचे छत्र हरवले त्यानंतर आईने अंगणवाडीत सेविका म्हणून काम करून आपल्या मुलाचे पालनपोषण केले आज ती सुद्धा अचानक निघून गेली परंतु त्यांचे आजोबा आजी मामा हे त्यांचा सांभाळ करत आहेत.आज मिळालेले हे सानुग्रह अनुदान यामुळे आम्हाला या विभागाचे सहकार्य असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *