पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) कोरोना च्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेल्या शाळा नुकत्याच सुरू झाल्यानंतर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देखील आनंदाची बातमी आली असून दि १ फेब्रुवारी पासून महाविद्यालये चालू करण्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले परंतु ज्या विद्यार्थ्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले आहेत अशाच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे

        गेली दोन वर्षे कोरोना चा कहर असल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान झाले शाळा महाविद्यालय बंद करण्यात आली केवळ ऑनलाइन शिक्षण चालू होते परंतु  यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान झाले सध्या देशात कोरोनाची तिसरी लाट चालू असली तरीही ती तुलनेने तीव्र नसल्याने राज्य सरकारने शाळा महाविद्यालय चालू करण्याचा निर्णय घेतला.
       अंगणवाडी पासून इयत्ता बारावी पर्यंतची सर्व शाळा गेल्या सोमवार पासून चालू झाल्या तरीही काही जिल्ह्यातील कोरोनाची रुग्ण संख्या जास्त असल्याने एक आठवडयासाठी पुढे ढकलण्यात आली आहे, काळ उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी दि १ फेब्रुवारी पासून महाविद्यालयीन शिक्षण चालू करण्याचा निर्णय घेतला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *