पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) गेल्या वर्षभरामध्ये ग्रामपंचायत नायगाव हद्दीतील गावठाणातील रोहित्रावरील ग्राहक संख्या वाढत गेल्याने ते वारंवार जळत होते, विजेची मागणी जास्त  वाढत गेल्याने तेवढ्या शक्तीचे रोहित्र बसविण्यासाठी आमदार अशोक पवार यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या वतीने वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत होता. आरोग्य उपकेंद्र नजीक २०० एचपी, भीम नगर खालची माळवाडी १०० एचपी, मारुती मंदिर शेजारी १०० एचपी याप्रमाणे वाढीव क्षमतेचे रोहित्र बसविण्यास मान्यता मिळाली आहे लवकरच ते बसून कार्यान्वित होणार आहेत. अशी माहिती नायगावचे सरपंच गणेश चौधरी व माजी सरपंच राजेंद्र चौधरी यांच्याकडून देण्यात आली. गेल्या आठ-दहा महिन्यात कृषी पंपाची वीज बिले भरण्यासाठी शेतकऱ्यांनी चांगले सहकार्य केले त्यामुळे गावाशी संबंधित असलेले प्रलंबित विषय पूर्ण करणे शक्य झाले आहेत. शेतकऱ्यांनी सध्या सुरू असलेले महावितरणची ५०% वीज बिल माफीची योजनेनुसार वीज बिले भरल्यास महावितरणला वीज ग्राहकांना चांगली सेवा देता येणे शक्य होणार आहे अशी माहिती उरळीकांचनचे उपअभियंता प्रदीप सुरवसे यांनी दिली.
महावितरणने मंजूर केलेल्या कामांबाबत ग्रामपंचायतच्या वतीने मुळशी विभागाचे कार्यकारी अभियंता माणिक राठोड , सूर्यवंशी , वाईकर व सर्व अधिकारी वर्ग व कर्मचारी यांचे आभार मानण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *