पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) कदम-वाकवस्ती पालखीस्थळ प्रवेशद्वार अथवा सभागृह याला स्व. राकेश आनंदराव काळभोर यांचे नाव देण्यात यावे अशा आशयाची मागणी एका निवेदनाद्वारे शिवसेनेच्या महिला बाल विकास समिती सदस्य कविता दत्तात्रेय अंबुरे यांनी केली आहे.
कदम-वाकवस्ती येथे असलेल्या पालखीस्थळावर पुर्वी काही लोकांनी खाजगी संस्था उभारण्याचा प्रयत्न केला होता. परंतु स्थानिक नागरीक आणि स्व. राकेश आनंदराव काळभोर यांनी मिळून त्या ठिकाणी पालखीस्थळ होण्यासाठी मोठे प्रयत्न केले व तेथे मुलांकरीता खेळण्यासाठी मैदान, नागरीकांसाठी वॉकिंग ट्रॅक व इतर सुविधा होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि त्यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला. त्याचे फलस्वरूप आज स्थानिक नागरीक मोठ्या प्रमाणावर या मैदानाचा व सभागृहाचा लाभ घेताना दिसत आहेत. पालखी स्थळाचे अध्यक्ष मोरे,तसेच माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, कै. राकेश आनंदराव काळभोर व इतर मान्यवरांच्या अथक प्रयत्नातुन पालखी स्थळाचा कायापालट झाला आहे. व त्याचा फायदा नवयुवक व स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर झाला आहे.
पालखी स्थळावरील सभागृहात गोरगरीबांची लग्ने समाजिक कार्याचे उपक्रम मोठ्या प्रमाणात होत आहेत. व कै. राकेश आनंदराव काळभोर यांचे खुप मोठे योगदान असुन त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ पालखी प्रवेशद्वारास किंवा सभागृहाला त्यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी शिवसेनेचे दत्तात्रेय माणिक अंबुरे व स्थानिक नागरिकांनी केली. हे निवेदन कदम-वाकवस्ती चे सरपंच गौरी गायकवाड, ग्रामसेवक अमोल घोळवे व सामाजिक कार्यकर्ते चित्तरंजन गायकवाड यांना दिले.
