पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) खासदार डॉ अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेल्या व्हाय आय किल्ड गांधी या चित्रपटास अनेकांचा विरोध असताना राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मात्र एक कलाकार म्हणून यांची पाठराखण केली आहे

      डॉ अमोल कोल्हे यांनी या चित्रपटात नथुराम गोडसे यांची भूमिका साकारली आहे या चित्रपटाचा ट्रेलर नुकसान प्रकाशित करण्यात आला त्यानंतर मिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उघड विरोध करत ही भूमिका नथुरामाच्या विचाराचे समर्थन केले जाऊ शकत नाही तेव्हा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी एक कलाकार म्हणून ते योग्य आहेत असे बोलून त्यांना पाठिंबा दिला.
        आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले की, अमोल कोल्हे हे कलाकार आहेत त्यांनी भूमिका पार पडली त्यामुळे त्यांना हे विचार मान्य आहेत असे म्हटले जाऊ नये हा चित्रपट चित्रीकरण झाला तेंव्हा ते पक्षात नव्हते त्यामुळे ती विचारधारा त्यांना मान्य आहे असे म्हणता येणार नाही.
          काँग्रेसने मात्र यास तीव्र विरोध करत चित्रपटाच्या प्रदर्शनास विरोध दर्शविला आहे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यास विरोध दर्शवित राज्यात तीव्र आंदोलन केले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *