पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) राज्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत असून दररोज मोठी भर पडत आहे असे असले तरीही विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी सर्व नियम पाळून येत्या सोमवार पासून शाळा सुरू करण्यात येणार असल्याचे राज्य शासनाने जाहीर केले आहे यावर संमिश्र प्रतिक्रिया येत असली तरीही पुणे व औरंगाबाद येथील झपाट्याने वाढत जाणारी रुग्ण संख्या पाहता स्थानिक पातळीवर काय निर्णय होईल यासाठी थोडी वाट पहावी लागेल.

        कोरोना रुग्णाची गेल्या काही दिवसात वाढ झालेली असताना शाळा चालू व्हाव्यात यासाठी दबाव निर्माण केला जात होता त्यावर राज्य शिक्षण विभागाने त्यासंदर्भात प्रस्ताव मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवला होता त्यावर मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा होऊन सोमवार पासून शाळा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे
       इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतचे वर्ग चालू होतील त्यानंतर उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महाविद्यालयासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल असे सांगितले.
       गेली दोन वर्षे शाळेत विद्यार्थ्याचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे त्यामुळे ही पोकळी कशी भरून काढायची हा अवघड विषय बनला आहे पालकांना आपल्या पाल्याच्या प्रगतीची धास्ती आहे त्यामुळे शाळा सुरू होणे गरजेचे असल्याचे अनेकजण सांगतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *