पुणे (हवेलीनामा वृत समूह)  मराठी भाषेचा कणा असलेल्या मराठी शाळांची दिवसेंदिवस होत असलेली पीछेहाट पाहता भविष्यात मराठी वाचक किती उरतील मग मराठीकरणाच्या नावावर आज होत असलेल्या आंदोलनाचे फलित काय असणार हे येणारा कालच उत्तर असेल.

      महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला आपल्या मातृभाषेची गरिमा आहेच मग आपल्या मातृभाषेतून आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी प्रत्येकांनी पुढाकार घ्यायला हवा परंतु सध्याचे चित्र नेमकं उलट दिसतंय त्यामुळे गेल्या काही दिवसापासून मराठी शाळेतील विद्यार्थ्यां संख्येच्या टक्क्यात कमालीची घसरण होत आहे याला आधुनिकीकरण असे गोंडस नाव दिल जातंय परंतु आजपर्यंत याच मराठी शाळेतीलच विद्यार्थ्यांनी सर्वच क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला होता मग आताच असे नेमके काय वेगळेपण या इंग्रजी शाळेत दडलंय?
         मराठी भाषा समृद्ध आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व नागरिकांनी हिच्या विस्तारासाठी  प्रयत्न करण्याची वेळ आली आहे मराठी शाळेत शिक्षण घेणारा हा सर्वसामान्य नाही तर असामान्य विद्यार्थी असला पाहिजे यासाठी चळवळ उभी राहिली पाहिजे कारण एकट्या मुंबईत गेल्या दशकात १३० मराठी शाळा बंद झाल्या तर मराठी शाळेतील विद्यार्थी संख्या तब्बल ६५ टक्क्यांनी घटली. मग राज्यातील इतर शहर व ग्रामीण भागातील काय परिस्थिती असेल याची कल्पना येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *