पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) अंजनाबाई गावित व तिच्या दोन मुलींनी उदरनिर्वाहासाठी आपल्या मुलीच्या साथीने चोरीचा मार्ग निवलंबला व पाच वर्षात विविध ठिकाणाहून बारा बालकांचे अपहरण केले व त्यांच्या कडून भीक मागून घेतली जात होती विरोध करणाऱ्या पाच बालकांची त्यांनी दगडावर आपटून हत्या केली या हत्येत मायलेकी व रेणुकाचा नवरा देखील सामील होता याचा सुगावा लागल्यानंतर पोलिसांनी अंजनाला बेड्या ठोकल्या १९९० ते ९६ या काळात १४ मुलांचे अपहरण झाले यातील काही अपहरण आणि हत्या त्यांनी केल्याचे या  तपासात समोर आले .कोल्हापुरातील सत्र न्यायालयाने २००१ मध्ये अंजनाबाई गावित व तिच्या दोन मुली रेणुका शिंदे व सीमा गावित यांना दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली होती २००४ मध्ये उच्च न्यायालयाने तर २००६ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ती शिक्षा कायम ठेवली त्यानंतर या दोघींनी २००८ मध्ये राष्ट्रपती कडे दयेचा अर्ज केला तोही फेटाळण्यात आला त्यानंतर गावित भगिनींनी पंचवीस वर्षाहून अधिक काळ कोठडी भोगली त्यामुळे त्यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात यावी आणि सुटकेच्या आदेश देण्यात यावेत अशी विनंती अर्जाद्वारे उच्च न्यायालयात केली होती खंडपीठाने १८ डिसेंबर रोजी निकाल राखून ठेवला होता. न्यायमूर्ती नितीन जामदार व एस व्ही कोतवाल या खंडपीठाने केंद्र व राज्य सरकारने फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यास विलंब केल्याबद्दल उच्च न्यायालयाने ताशेरे ओढत गावित भगिनीची फाशीची शिक्षा कमी करून जन्मठेपेची शिक्षा सुनावली

     कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात सन १९९० – ९६ यादरम्यान बालकांच्या होणाऱ्या अपहरण मुळे एकच खळबळ उडाली मूळची नाशिकची असलेली अंजनाबाई गावित व तिच्या मुलींनी हे अपहरण घडवून आणले होते अंजनाबाई हिचा एका चालकाची विवाह झाला होता त्यानंतर नाशिक सोडून तिने दुसरा विवाह केला तोही फार काळ टिकू शकला नाही या दरम्यान तिने दोन मुलींना जन्म दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *